शिक्षक संघटनांनी ठोकले शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:52+5:302021-05-21T04:16:52+5:30
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी व तक्रारीसंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ, तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या ...
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी व तक्रारीसंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ, तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या वतीने तीन दिवसांपूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याबाबत इशारा दिलेला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यातील पदाधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले असता शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हत्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क केला असता, त्या बाहेरगावी असल्याचे समजले. त्यामुळे अधीक्षक सुधीर पगार व उपशिक्षणाधिकारी अनिल शहरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक कार्यालयाबद्दल तक्रारी मांडल्या. यावेळी दि. १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंतची सर्व प्रकारचे मेडिकल बिले काढले असे वेतनपथक अधीक्षक उदय देवरे यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील अनेक बिले पुरावे म्हणून सादर केली. ती बिले निघाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. लॉकडाऊनच्या काळातही काही संस्थाचालक व मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत येण्याबाबत सक्ती करतात, तसेच कारणे दाखवा नोटिसा देतात. याबाबत संबंधित शाळांची नावे कळविल्यास त्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक पगार व उपशिक्षणाधिकारी शहारे यानी विनंती केल्याने पदाधिकाऱ्यांनी कुलूप काढले व पुढील काळात वेतन पथक अधीक्षक यांच्यासमवेत सविस्तर बैठक घेऊन सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम, मालेगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष अनिल अहिरे, सचिन देशमुख, शिक्षक परिषदेचे दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, प्रदीप सिंग पाटील, त्र्यंबक मार्तंड, मनोहर देसाई, देशमुख, जयेश सावंत, अशोक मार्तंड, सचिन शेवाळे, आशिष पवार, राजेंद्र शेळके, डी. आर. पठाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोट...
मेडिकल बिल, पगार वेळेवर होत नसल्याबाबत वेतन पथक अधीक्षक देवरे यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावेत. लॉकडाऊन काळात शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देणे योग्य नाही.
- सचिन देशमुख मालेगाव
फोटो - २० मालेगाव १
नाशिक येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप लावताना साहेबराव कुटे, आर. डी. निकम, सचिन देशमुख, दत्ता पाटील, नीलेश ठाकूर, जयेश सावंत, आदी उपस्थित होते.
===Photopath===
200521\20nsk_24_20052021_13.jpg
===Caption===
नाशिक येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप लावतांना साहेबराव कुटे, आर डी निकम, सचिन देशमुख, दत्ता पाटील, निलेश ठाकूर, जयेश सावंत आदी.