मुक्तानंद महाविद्यालयाचे सोमवारपासून अध्यापनाचे वर्ग सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 05:58 PM2021-02-13T17:58:50+5:302021-02-13T17:59:15+5:30
नगरसुल : येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात सोमवार (दि.१५) पासुन नियमित अध्यापनाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती प्राचार्य, डॉ, धनराज गोस्वामी यांनी पत्रकाद्वारे दिली.कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे मार्च २०२० पासुन महाविद्यालयाची शैक्षणिक घडी पुर्णतः विस्कळीत झाली होती. दरम्यान ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिकविण्याचे कामकाज सुरु होते.

विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाने निर्गमीत केलेल्या परिपत्रकानुसार अध्यापनाचे कामकाज सुरू होणार असून याबाबत महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अमलबजावणी करणे सुरु केले असून त्यात अध्यापन आसनव्यवस्था, प्रयोगशाळा, ग्ंथालय स्वच्छता व इतर कोरोनाच्या संबंधित सर्व बाबीचे काटेकोरपणे अमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती गोस्वामी यांनी दिली आहे.