नाशकात विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासरुमद्वारे शिकवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 02:26 PM2020-03-23T14:26:50+5:302020-03-23T14:28:35+5:30
ऑनलाईन क्लासरुमच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक त्यांचे शैक्षणिक साहित्य, व्हीडीओ, नोट्स, आदी विद्यार्थांपर्यंत एकाच वेळेस पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून त्यांच्यावेळे प्रमाणे या शैक्षणिक साहित्याच्या आधारे अभ्यास करू शकणार आहेत. यामाध्यमातन प्राध्यपाकांना अभ्यासक्रमातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने सहजरीत्या विद्यार्थांपर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे.
नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे विद्यापिठाने सर्व संलग्नित संलग्न महाविद्यालयातीलप्राध्यापकांना २५ मार्च २०२० पर्यत घरूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नाशिक शहरातील केटीएचएम वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपापल्या पदव्युत्तर वर्गांचे ऑनलाइन क्लासरूम तयार केले आहे.
ऑनलाईन क्लासरुमच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक त्यांचे शैक्षणिक साहित्य, व्हीडीओ, नोट्स, आदी विद्यार्थांपर्यंत एकाच वेळेस पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून त्यांच्यावेळे प्रमाणे या शैक्षणिक साहित्याच्या आधारे अभ्यास करू शकणार आहेत. यामाध्यमातन प्राध्यपाकांना अभ्यासक्रमातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने सहजरीत्या विद्यार्थांपर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे. प्राध्यपाकांचे हे व्हर्च्युअल क्लासरूम स्टडी फ्रअभ्यासक्रमासाठी पूरक आहेत. या ऑनलाईन क्लासरूमद्वारे विविध पद्धतीचे मुल्यांकन करता येते. त्याशिवाय बऱ्याच मूल्यांकनासाठी गुणांकनही स्वयंचलित पद्धतीने होते. या सवार्मुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात चांगला संवाद निर्माण होत आहे. महाविद्यालयात या शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांसाठी विशेष सॉफ्टवेअर वापरले गेले आहे. त्यासाठी महावादियालायाचे प्रार्चार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.