तिखट हिरव्या मिरचीने आणले बळिराजाच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:13+5:302021-05-25T04:16:13+5:30

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका बसल्याने तिखट हिरव्या मिरचीने त्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. येवल्यातील तालुक्यातील बदापूर शिवारातील गट.नं.१११ ...

Tears in Baliraja's eyes brought by hot green chillies | तिखट हिरव्या मिरचीने आणले बळिराजाच्या डोळ्यात पाणी

तिखट हिरव्या मिरचीने आणले बळिराजाच्या डोळ्यात पाणी

Next

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका बसल्याने तिखट हिरव्या मिरचीने त्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

येवल्यातील तालुक्यातील बदापूर शिवारातील गट.नं.१११ मध्ये नानासाहेब शिंदे या शेतकऱ्याने एक एकरात ठिबक सिंचन, पेपर अंथरूण, रासायनिक खते, गांडूळ, खते, मिक्स करून मिरचीची लागवड केली. लिक्विड खते, औषधे, बांबू, तार, औषधे फवारणी, लागवड केल्यापासून उत्पन्न सुरू होईपर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला चांगला बाजारभाव मिळेल या आशेपोटी नानासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारीत मिरचीची लागवड केली. तीन साडेतीन महिन्यांनंतर मिरचीचे उत्पादन सुरू व्हायच्या वेळेस शासनाच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊनमुळे शेतात तयार असलेली मिरची बाजारात घेऊन जाता येईना, त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतावरच मिरची विक्री करावी लागली या विक्रीतून ६० ते ७० हजार रुपये हाताशी आले. दोन लाख रुपये भांडवल अडकवून हाती साठ-सत्तर हजार रुपये आल्याने शेती हा बिनभरवशाचा व्यवसाय असल्याची उद्विग्न भावना शिंदे यांनी व्यक्त केली. उन्हाळ्यात आलेल्या मिरचीच्या उत्पन्नातून खरिपाच्या पिकासाठी भांडवल उभे करता येईल या आशेवर असलेल्या नानासाहेब शिंदे यांना आता पुन्हा एकदा खरिपाच्या पेरणीसाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे? असा प्रश्न पडला आहे.

कोट...

फेब्रुवारी महिन्यात एक एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली. यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला. एक एकर मिरची लागवडीतून भांडवलापोटी खर्च केलेले दोन लाख रुपये मिळतील की नाही याची शंका आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने मिरची बाजारात विक्रीसाठी नेता आली नाही, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून, आता खरिपाच्या पेरणीसाठी भांडवल कुठून उभे करावे? असा प्रश्न पडला आहे.

- नानासाहेब शिंदे,

शेतकरी, बदापूर

फोटो - २४ जळगावनेऊर१

येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकरी नानासाहेब शिंदे आपल्या कुटुंबासमवेत मिरचीची तोडणी करताना.

===Photopath===

240521\24nsk_37_24052021_13.jpg

===Caption===

येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकरी नानासाहेब शिंदे आपल्या कुटुंबासमवेत मिरचीची तोडणी करताना.

Web Title: Tears in Baliraja's eyes brought by hot green chillies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.