राजापूरसह ४१ गाव पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:06 AM2022-02-05T00:06:38+5:302022-02-05T00:06:38+5:30

येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे.

Technical approval for 41 village water supply schemes including Rajapur | राजापूरसह ४१ गाव पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता

राजापूरसह ४१ गाव पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता

Next
ठळक मुद्दे१६५ कोटी निधी उपलब्ध : लवकर प्रशासकीय मान्यता मिळणार

येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे.
सातत्याने दुष्काळग्रस्त असणाऱ्या तालुक्यातील राजापूर भागातील टंचाईग्रस्त गावांची टंचाईतून मुक्तता करण्यासाठी सदरची योजना गेल्या तीन-चार वर्षापासून मंजुरीच्या पातळीवर आहे. लवकरच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे पुढील आठवड्यामध्ये प्रशासकीय मान्यता देऊन सदरील योजनेला मंजुरी देणार आहेत. सदरील पाणीयोजनेसाठी पाणी नांदूरमधमेश्वर धरणातून उचलले जाणार असून ते शुद्धिकरणासाठी पन्हाळसाठे येथे फिल्टरेशन प्लांट झाल्यानंतर सदरील पाणी ग्रॅव्हिटीद्वारे राजापूरसह ४२ गाव योजनेतील गावांना जाणार आहे. नुकताच या योजनेचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडा सन २०१८-२०१९ मध्ये करण्यात आलेला आहे. सदर योजनेची कृती आराखड्याप्रमाणे अंदाजित किंमत १६५ कोटी एवढी आहे.

या गावांना मिळणार फायदा
सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. डोंगरी भागातील ही गावे टंचाईग्रस्त असून यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. सदरची योजना झाल्यास संपूर्ण तालुका टँकरमुक्त होऊ शकणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांनी दिली.

Web Title: Technical approval for 41 village water supply schemes including Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.