तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; मंगलाच्या बोगीतून धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:33 AM2020-01-19T00:33:45+5:302020-01-19T00:56:10+5:30

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मनमाड स्थानकात या गाडीची बोगी बदलून मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र यामुळे गाडीला दीड तासाचा विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तसेच मंगला एक्स्प्रेसच्या बोगीतून धूर निघण्याची घटना घडली़

Technical breakdown in Tapovan Express; Smoke from Mars bog | तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; मंगलाच्या बोगीतून धूर

मंगला एक्स्प्रेसच्या चाकातून धूर निघाल्याने समिट स्थानकाजवळ थांबलेली गाडी.

Next

मनमाड : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मनमाड स्थानकात या गाडीची बोगी बदलून मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र यामुळे गाडीला दीड तासाचा विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तसेच मंगला एक्स्प्रेसच्या बोगीतून धूर निघण्याची घटना घडली़
शनिवारी (दि.१८) सायंकाळी तपोवन एक्स्प्रेस अंकाई ते मनमाड स्थानकादरम्यान धावत असताना गाडीच्या एक प्रवासी बोगीच्या चाकाजवळील स्प्रिंग तुटल्याने मोठा आवाज झाला. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. ही गाडी मनमाड स्थानकात आल्यानंतर दुरु स्तीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दुरु स्ती न झाल्याने अखेर ती बोगी मनमाड स्थानकात काढून घेत गाडी रवाना करण्यात आली. यामध्ये गाडीला दीड तासाचा विलंब झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. याचबरोबर मंगला एक्स्प्रेसच्या बोगीतूनही धूर निघत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस समिट स्थानकाजवळ आली असता डब्याखालून धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. गाडीतील प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. घाबरलेल्या काही प्रवाशांनी गाडीतून उड्यादेखील मारल्या. गाडीचे ब्रेक चाकाला चिटकल्यानं घर्षण होऊन धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. सदरची गाडी मनमाड स्थानकात आल्यानंतर ब्रेकची दुरु स्ती करून गाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली. याते गाडीला अर्धा तासाचा विलंब झाला.

Web Title: Technical breakdown in Tapovan Express; Smoke from Mars bog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे