सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:13 IST2020-12-21T00:13:18+5:302020-12-21T00:13:50+5:30
इंदिरानगर परिसरात वडाळा - पाथर्डी व वडाळा-राजीवनगर रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र रविवारी (दि.२०) सायंकाळी या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत
इंदिरानगर : परिसरात वडाळा - पाथर्डी व वडाळा-राजीवनगर रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र रविवारी (दि.२०) सायंकाळी या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे सिग्नलमध्ये बिघाड होऊन वाहतूक कोंडी होत असतानाही येथे वाहतूक पोलीस नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सिग्नलवर अनेकजण वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतात. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.