मानोरी येथे तंत्रस्रेही शिक्षकांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:16 AM2018-10-26T00:16:59+5:302018-10-26T00:18:28+5:30
दिंडोरी : तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची दोनदिवसीय कार्यशाळा मानोरी येथे झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पाहिले.
दिंडोरी : तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची दोनदिवसीय कार्यशाळा मानोरी येथे झाली. कार्यशाळेत सुलभक म्हणून प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे व श्रावण भोये यांनी कामकाज पाहिले.
विद्या प्राधिकरण, नाशिकचे अधिव्याख्याता भगवान खारके, विषयतज्ज्ञ वैभव शिंदे, वाल्मीक चव्हाण, प्रशांत पगार, शेखर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्र शाळेतील सहा विषयांसाठी प्रत्येकी दोन शिक्षक याप्रमाणे क्लस्टर रिसोर्स ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्याच ग्रुपमधील दिंडोरी तालुक्यातील एकोणावीस केंद्रातील प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ३८ तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे, श्रावण भोये यांनी शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती, ब्लॉग निर्मिती व डिझाइन, झूम मीटिंग, ई-ग्रंथालय, डिजिटल स्कूल, यू-ट्यूबवरील व्हिडीओ डाउनलोड करणे, मोबाइल स्क्रीन मिररिंग, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, आॅनलाइन टेस्ट निर्मिती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. श्रावण भोये यांनी आभार मानले.
कार्यशाळेला एस. एस. घोलप, सी. बी. गवळी, के. पी. सोनार, नीलेश पाटोळे आदींसह शरद कोठावदे, यजुवेंद्र पागे, राजेंद्र गांगुर्डे, रामदास धात्रक, दादासाहेब ठाकरे आदींसह सर्व केंद्रप्रमुखांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.उपस्थितांची आॅनलाइन हजेरी नोंदवून घेण्यात आली. राज्यस्तरीय कामकाजात सातत्याने सहभाग घेणारे तंत्रस्नेही गुरू प्रकाश चव्हाण यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. विलास जमदाडे यांनी कार्यशाळेचे स्वरूप उद्दिष्ट यावर माहिती दिली.