तंत्रज्ञान चौकटीत अडकले : बोकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:01 AM2019-07-02T01:01:49+5:302019-07-02T01:02:04+5:30

सेवाक्षेत्रात प्रगतीसाठी भारतासमोर मोठ्या संधी उपलब्ध असून, आरोग्य आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात सर्वाधिक पर्याय खुले आहे. मात्र, भारतीय तंत्रज्ञान क्रयशक्तीअभावी एका चौकटीत अडकले आहे.

 Technology Stuck in the Box: Bokil | तंत्रज्ञान चौकटीत अडकले : बोकील

तंत्रज्ञान चौकटीत अडकले : बोकील

Next

नाशिक : सेवाक्षेत्रात प्रगतीसाठी भारतासमोर मोठ्या संधी उपलब्ध असून, आरोग्य आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात सर्वाधिक पर्याय खुले आहे. मात्र, भारतीय तंत्रज्ञान क्रयशक्तीअभावी एका चौकटीत अडकले आहे. योग्य काय आहे यापेक्षा परवडणारे काय आहे, याचाच अधिक विचार केला जातो, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी केले.
पीएलजीपीएल मेगा अल्युमनी असोसिएशनतर्फे आयोजित नाशिक महाकुंभ-२०१९ कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आॅटो मोबाइल उद्योग क्षेत्रातील नंदकुमार खंदारे, राजू गाढवे, निर्मला थोरमोटे, सुनील मेंढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. बोकील म्हणाले, पैसा हा व्यक्तिगत नव्हे तर सार्वजनिक मालमत्ता आहे. पैसा बॅँकेत जातो तेव्हा तो सार्वजनिक व्यवस्थेत जातो आणि त्याची क्रयशक्ती वाढते. अशीच क्रयशक्ती वाढवून औद्यगिक आणि आर्थिक विकास साधला जाऊ शकतो. त्यानंतर नंदकुमार खंदारे यांनी आॅटोमोबाइल उद्योग क्षेत्रातील नवीन आव्हाने आणि संधी’ याविषयी मार्गदर्शन केले. राजू गाढवे, निर्मला थोरमोटे यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title:  Technology Stuck in the Box: Bokil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.