दहावीच्या विद्यार्थिनींसाठी किशोरी प्रशिक्षण कार्यक्रम
By admin | Published: August 3, 2015 11:10 PM2015-08-03T23:10:32+5:302015-08-03T23:11:49+5:30
दहावीच्या विद्यार्थिनींसाठी किशोरी प्रशिक्षण कार्यक्रम
.
सातपूर : मायको एम्प्लॉईज फोरम या सामाजिक संस्थेच्या वतीने अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी ‘किशोरी प्रशिक्षण’ कार्यशाळा घेण्यात आली.
जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत मायको फोरमच्या वतीने मौले हॉल येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेतील विद्यार्थिनींना सिन्नर येथील युवा मित्र संस्थेच्या मनीषा पोटे यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या त्यावरील उपाययोजना, ताणतणाव, स्वच्छतेविषयी घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अशपाक कागदी यांनी केले. सूत्रसंचालन बी. ए. सोनवणे यांनी केले. स्वागत आनंद सोनवणे यांनी केले. जे. एन. पटेल यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)