तहसील कार्यालय स्थलांतराला विरोध करण्यासाठी निफाड बंद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:18 PM2018-10-16T16:18:18+5:302018-10-16T16:19:14+5:30

निफाडला रास्ता रोको आंदोलन , निफाड तहसिलवर मोर्चा

 The Tehsil office succeeded to stop the defiance of the migrants | तहसील कार्यालय स्थलांतराला विरोध करण्यासाठी निफाड बंद यशस्वी

निफाड येथे रास्ता रोको प्रसंगी भाषण करतांना राजेंद्र डोखळे ,सोबत राजाभाऊ शेलार ,सुभाष कराड , राजेंद्र राठी , देवदत्त कापसे ,बापूसाहेब कुंदे ,दिलीप कापसे ,यांच्यासह निफाडकर नागरिक .

Next
ठळक मुद्देआज मंगळवार दि .१६ रोजी अनिल कुंदे यांनी आपले आमरण उपोषण चालू ठेवले. कुंदे यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी दिवसभर मान्यवर नेते , निफाडमधील नागरिक यांनी कुंदे यांची भेट घेतली.


निफाड : येथील तहसील कार्यालय निफाडपासून मोजे रसलपूर शिवारात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मंगळवारी निफाडकरांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. निफाड शहर दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
शासकीय स्तरावर निफाडचे तहसील कार्यलय रसलपूर शिवारात हलवण्याची हालचाली सुरू झाल्याच्या पाशर््ववभूमीवर निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे हे सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. निफाडकरांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. सकाळपासूनच या बंदला प्रारंभ झाला दुकाने ,हॉटेल्स , गॅरेज , टपर्या , आदी सर्व बंद ठेवण्यात आल्या होत्या. निफाड व्यापारी असोशिएशन , दुकानदार , निफाड शहर दस्तलेखक व मुद्रांक विक्र ेते संघटना,निफाड वकील संघ व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
निफडकारांनी शांतीनगर त्रिफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नाशिक औरंगाबाद, येवला,पिंपळगांव बसवंत कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती या ठिकाणी राजेंद्र डोखळे ,राजाभाऊ शेलार ,सुभाष कराड यांची भाषणे झाली रास्ता रोको आंदोलनानंतर आंदोलक मोर्चाने निफाड बसस्थानक मार्गे निफाड तहसील कार्यालय येथे आले या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी या प्रश्नावर आमरण उपोषण करणारे निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुंदेयांनीनिफाड तहसील कार्यालय हे दूर अंतरावरील रसलपूर फाट्यावर नेण्याचा प्रकार म्हणजे निफाडच्या नागरिकांवर अन्यायकारक आहे आम्ही याप्रश्नावर आंदोलनाची त्रिव्रता अधिक वाढवणार असून शुक्र वार दि .१९ पासून निफाड शहर बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी निफाडचे नगरसेवक राजाभाऊ शेलार , माणिक बोरस्ते ,राजेंद्र डोखळे ,, सुभाष कराड , निफाडच्या माजी सरपंच सौ भारती कापसे , बापूसाहेब कुंदे , विक्र म रंधवे , हरिश्चंद्र भवर, जी एन . शिंदे , ,माधव निचित बाळासाहेब गोसावी , राजेंद्र सोमवंशी , जानकीराम धारराव ,तौसिफ मन्सुरी, आसिफ पठाण, बाबुराव आहेरराव ,नितीन जाधव , सुहास सुरळीकर,विनायक शिंदे , बाळासाहेब पेंढारकर यांची भाषणे झाली. यानंतर निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निफाड तहसील कार्यालय रसलपूर शिवारात स्थलांतरित झाल्यास निफाड तालुक्यातून येणाऱ्या जनतेची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसाय होणार आहे. रसलपूरची ही प्रस्तावित नवीन जागा ही निफाडपासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. निफाडच्या तहसील कार्यालयाजवळ मुबलक जागा असून हेच जुने तहसील कार्यालय अद्यावत केल्यास निफाडकर या निर्णयाचे जरूर स्वागत करतील मात्र आम्ही निफाडकर कोणत्याही परिस्थितीत निफाड तहसील कार्यालय रसलपूर शिवारात हलवू देणार नाही यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे . मी निफाडकरांच्या भावना शासनाला कळवतो असे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी मोर्चेकº्यांना दिले. याप्रसगी राजेंद्र राठी , वाल्मिक कापसे , निफाडचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे ,उपनगराध्यक्ष सौ स्वाती गाजरे , नगरसेवक देवदत्त कापसे , दिलीप कापसे , चारु शीला कर्डीले , संजय धारराव, , दीपक गाजरे , सुनील निकाळे , अभिजित चोरिडया , सचिन गीते ,सचिन खडताळे , हेमंत खडताळे , यांच्यासह नागरिक दुकानदारवर्ग व्यापारी , दस्तलेखक , मुद्रांक विक्र ेते ,निफाड न्यायालयाचा वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title:  The Tehsil office succeeded to stop the defiance of the migrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.