तीन किलोमीटर पायपीट करत तहसीलदारांनी पोहचवली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 02:27 PM2020-04-23T14:27:54+5:302020-04-23T14:28:04+5:30

पेठ - बेहेडपाडा नाशिक जिल्ह्याच्या पाश्चिम सीमावर्ती भागातील सर्वात अतिदुर्गम पाडे. गावापर्यंत पोहचायला धड रस्ताही नाही अशा परिस्थितीत यशोदिप सामाजिक संस्थेच्या सहकार्याने स्वत: तहसीलदार हातात जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट घेऊन तीन किमी पायपीट करत या गावापर्यंत पोहचले आणि गरजूंना मदतीचा हात दिला.

 Tehsildar delivered help by piping three kilometers | तीन किलोमीटर पायपीट करत तहसीलदारांनी पोहचवली मदत

तीन किलोमीटर पायपीट करत तहसीलदारांनी पोहचवली मदत

Next

पेठ - बेहेडपाडा नाशिक जिल्ह्याच्या पाश्चिम सीमावर्ती भागातील सर्वात अतिदुर्गम पाडे. गावापर्यंत पोहचायला धड रस्ताही नाही अशा परिस्थितीत यशोदिप सामाजिक संस्थेच्या सहकार्याने स्वत: तहसीलदार हातात जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट घेऊन तीन किमी पायपीट करत या गावापर्यंत पोहचले आणि गरजूंना मदतीचा हात दिला.
आदिवासी भागातील उच्चशिक्षण घेऊन शासकिय सेवेत असलेल्या नोकरदार अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट, घनशाम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली यशोदिप बहुद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना केली. सद्या कोरोनामुळे संकटात सापडलेल्या ५०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बेहेडपाडा गावात तहसीलदार संदिप भोसले संस्थेच्या सदस्यांसह डोक्यावर ओझे घेऊन तीन किमी पायपीट करत गावात पोहचले आणि शेतमजूरांना मदत पोहच केली. पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीचीबारी, पाहुचीबारी, आमडोंगरा, चौकडा, विहीरीची आळी, शिंगदरी, तांदळाचीबारी, देवडोंगरा, गोळसपाडा यासह इतर गावातील गरजवंताना संकटकाळी यशोदिपने मदत पोहचवली.
याप्रसंगी यशोदीप संस्थेचे अध्यक्ष गिरीश गावीत, डॉ. योगेश भरसट, घनशाम महाले, राजेंद्र भोये,महेश तुंगार,रमेश चौधरी,राजेश भोये, देवदत्त चौधरी,धनराज सगणे ,गोवर्धन खंबाईत,विजय तरवारे,मुरलिधर चौधरी,पुंडलिक सातपुते, जनार्दन खोटरे, दिलीप भूसारे, विलास कुवर, प्रकाश गवळी, विजय वाघेरे, राहुल खंबाईत, दिपक हलकंदर, विद्याधर गवळी, सुभाष भुसारे, ओमप्रकाश भोयेयांचेसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
-----------------
पेठ तालुक्यात सद्या कामावर गेलेले शेतमजूर गावावर आले असून हाताला काम नसल्याने त्यांना काही दिवस शासकिय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दतीचा ओघ सुरू आहे. सोशल नेटवर्किंग फोरमने दोन हजार तर यशोदीप सामाजिक संस्थेने जवळपास ५०० कुंटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे. इतर ठिकाणीही अनेक दानशूर सामाजिक दायित्व निभावत आहेत.
-संदिप भोसले, तहसीलदार पेठ

Web Title:  Tehsildar delivered help by piping three kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक