दस्तऐवजांचा काटेकोर तपासणी करण्याचे तहसीलदारांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:55 PM2021-02-13T23:55:05+5:302021-02-14T00:28:02+5:30
देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत.
देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत.
बनावट दस्तावेज तयार करून जमीन खरेदी करण्याच्या घटनेनंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला आहे. मंडल अधिकारी व तलाठी यांनी आलेल्या दस्तऐवजांचा काळजीपूर्वक तपासणी करून नंतरच नोंद करावी अशी सक्त सूचना तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी देवळा तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांना दिल्या आहेत.
देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. यात जबाबदार असलेले दुय्यम निबंधक कार्यालयाबरोबरच, मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडे देखील ह्या प्रकरणी संशयाची सुई वळली, यामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला असून तहसीलदार शेजुळ यांनी सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांना सक्त सूचना दिल्या आहेत.
_ देवळा तालुक्यात देवळा, लोहोणेर, उमराणा, व खर्डा अशी चार महसूल मंडळे असून सोळा तलाठी सजे आहेत. मेशी येथे तलाठी सजा असून तो उमराणा महसूल मंडळाच्या अखत्यारीत येतो.
_ बनावट मुद्रांकाच्या आधारे खोटे दस्तावेज तयार करून संगनमताने मेशी शिवारातील शेतजमिनीची (गट नं. ४००/१) परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार भास्कर धर्मा निकम यांनी दिल्यानंतर पोलिसांनी काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.