सीए परीक्षेत तेजस वागळे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:31 AM2018-07-24T00:31:18+5:302018-07-24T00:31:39+5:30

इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी, फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत तेजस वागळे या विद्यार्थ्याने १७वी रँक मिळविली असून, सीपीटी परीक्षेत नाशिकच्या ओमकार कातकाडे व फाउंडेशनमध्ये नील शाह अव्वल क्रमांक पटकावला आहे.

 Tejas Wagle tops in CA exams | सीए परीक्षेत तेजस वागळे अव्वल

सीए परीक्षेत तेजस वागळे अव्वल

Next

नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी, फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत तेजस वागळे या विद्यार्थ्याने १७वी रँक मिळविली असून, सीपीटी परीक्षेत नाशिकच्या ओमकार कातकाडे व फाउंडेशनमध्ये नील शाह अव्वल क्रमांक पटकावला आहे.  सीए परीक्षांच्या निकाल जाहीर झाला असला तरी मुख्य शाखेकडून नाशिक शाखेला निकालाची सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नसल्याने उत्तीर्णांची आकडेवारी स्पष्ट होऊ शकलेली नाही. परंतु, खासगी क्लासचालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे निकाल हाती आल्याने त्यांनी जल्लोष केला.  सी.ए. परीक्षेत नाशिकच्या यश जाजू यांच्यासह ओमकार कातकाडे याने २०० पैकी १८५ गुण मिळविले आहेत, तर संकेत दशपुते याने १८० गुण मिळविले आहेत. तर ऋतुजा दीक्षितने १७८, निरव मजेठियाने १७७, राज मोरेने १७४, ऋतुजा काळेने १७४, मंजिरी देवरेने १७३, दिशा गुप्ता हिने १७२, प्रशांत कोष्टीने १७१, अथर्व माळूशेने १७०, ऋ तिक बनखेळे १७०, जुई जाधव १६९, उमंग रंभिया १६८, तेजस पवार १६६ गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे. सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title:  Tejas Wagle tops in CA exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा