सांगा कसं जगायचं.., कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:54 PM2020-04-11T20:54:40+5:302020-04-12T00:28:39+5:30

गिरीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क मनमाड : मुलींच्या शाळेची थकलेली फी.. तिला शाळेत पोहोचवणाऱ्या रिक्षावाल्याचा तगादा.. त्यातच पत्नीच्या गरोदरपणामुळे सुरू असलेला दवाखाण्याचा खर्च.. अशा परिस्थितीत लॉकडाउनमुळे महिनाभरापासून बंद असलेला पाणीपुरीचा व्यवसाय.... सांगा कसं जगायच आम्ही? अन् कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा.., हा प्रश्न उपस्थित केला आहे मनमाड येथील स्टेशनरोडवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाºया सूरजसिंग कुशावह या तरुणाने.

 Tell me how to live .. How to drive a family car? | सांगा कसं जगायचं.., कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा?

सांगा कसं जगायचं.., कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा?

googlenewsNext

गिरीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : मुलींच्या शाळेची थकलेली फी.. तिला शाळेत पोहोचवणाऱ्या रिक्षावाल्याचा तगादा.. त्यातच पत्नीच्या गरोदरपणामुळे सुरू असलेला दवाखाण्याचा खर्च.. अशा परिस्थितीत लॉकडाउनमुळे महिनाभरापासून बंद असलेला पाणीपुरीचा व्यवसाय.... सांगा कसं जगायच आम्ही? अन् कसा हाकायचा कुटुंबाचा गाडा.., हा प्रश्न उपस्थित केला आहे मनमाड येथील स्टेशनरोडवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाºया सूरजसिंग कुशावह या तरुणाने.
पाणीपुरीचे नाव ऐकून जिभेला पाणी सुटते ना..! चविष्ट आणि मनाला भावणाºया या चटकदार पाणीपुरीचे चोचले पुरवणाºया पाणीपुरी व्यावसायिकांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. सूरज हा सतरा वर्षांपासून शहरातील वैंकुठ क्लॉथ सेंटरच्या समोर आपला छोटासा पाणीपुरीचा गाडा लावून व्यवसाय करतो. मूळचा उत्तर प्रदेशातील बेरागडा, जि. जालोन येथील रहिवासी असलेल्या सूरजने आपल्या चटकदार व मसालेदार पाणीपुरीने शहरातील खवय्यांना वेड लावले आहे. पहाटे पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. पुऱ्यांचे पीठ मळण्यापासून ते तळण्याचे काम भल्या पहाटेच सुरू होते. पाण्यासाठी चिंचेचा कोळ बनवणे, मसाला तयार करणे, रगडा तयार करणे या कामामध्ये त्याची पत्नी सोमबत्तीसुध्दा बरोबरीने मदत करते. दुपारी ३ वाजेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर सर्व साहित्य गाड्यावर चढवून स्टेशन रोडवर पाणीपुरी विक्रीचे काम सुरू होते. कष्टाला मेहनतीची जोड मिळाल्याने या व्यवसायात बºयापैकी पैसे मिळतात. घरातील गायत्री व राजनंदिनी या दोन मुलींचे शिक्षण, घरभाडे यासह सर्व खर्च भागवून गावी वृध्द आई-वडिलांना उदरनिर्वाहासाठी पैसे पाठवले जात असल्याचे सूरज सांगतो. अडचणींचा सामना करत सुरू असलेला पाणीपुरीचा हा व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चांगलाच संकटात सापडला आहे. यावर अवलंबून असलेल्या कुशवाह कुटुंबावर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. सध्या गरोदर पत्नी सोमबत्तीचे बाळंतपणाच्या खर्चाची चिंता, मुलींची शाळेची फी, थकलेले घरभाडे यामुळे गावी वृध्द माता पित्यांना पैसे पाठवू शकत नसल्याची खंत सूरजला सतावते आहे. अशीच परिस्थिती मंगलसिंग- जगदीश कुशावह, हरप्रसाद, रमाकांत यांच्यासह अन्य पाणीपुरी व्यावसायिकांची झाली आहे. कोरोना चा प्रादुर्भाव पाणीपुरी व्यवसायाच्या मुळावर उठला असल्याची भावना या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title:  Tell me how to live .. How to drive a family car?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक