सांगा, भाऊ भीती कोणाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:55 AM2019-09-28T00:55:32+5:302019-09-28T00:55:55+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे उमेदवार आता स्वत:च प्रचारासाठी व्हिडीओदेखील व्हायरल करीत आहेत. पूर्व नाशिक मतदारसंघात एका इच्छुकाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. यात झुंड में तो सुअर आते हंै, टायगर हमेशा अकेलेही आता हैं...
भटक्या
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे उमेदवार आता स्वत:च प्रचारासाठी व्हिडीओदेखील व्हायरल करीत आहेत. पूर्व नाशिक मतदारसंघात एका इच्छुकाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे. यात झुंड में तो सुअर आते हंै, टायगर हमेशा अकेलेही आता हैं... अशाप्रकारचा डायलॉग ऐकविण्यात आला आहे. विरोधकांना सुअर म्हणजेच चक्क वराह म्हटल्यामुळे मतदारांत काय संदेश जाऊ शकतो त्याचा विचारही संबंधिताने केलेला नाही. मध्य नाशिकमधील एका इच्छुकाने स्वत:च्या प्रचाराचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्याच्या बॅकराउंडला मन शुद्ध तुझं... तुला रे गड्या भीती कोणाची.. हे गाणं ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. इच्छुकांविषयी कोणी आरोप केलेले नाही की तक्रार, कोणी त्याला घाबरणारा किंवा भीत्रटदेखील म्हटले नाही, मग असा प्रचार का करावा, असा प्रश्न कार्यकर्त्यांतच चर्चिला जात आहे. यावर समर्थकांत चर्चा घडली. भाऊंनी असं म्हणायचे काय कारण.. यावर खल सुरू होता. अखेरीस एकाने भाऊ विद्यमान आमदारांना घाबरणार नाही ते लढणारच हे सांगण्यासाठीच हा व्हिडीओ केल्याचे आपल्या समजुतीने निराकारण केले आणि शंकेचे समाधान झाले. सोशल मीडियात अशी धूम सुरू असतानाच एका इच्छुकाचे समर्थक मतदारसंघातील मतदारांना रोज एक मेसेज पाठवत आहेत आणि त्यात सदर उमेदवार किती आध्यात्मिक आहेत याचे समर्थन करत आहेत. आता राजकारण आणि अध्यात्माचा काय संबंध?