चंदनपुरीतील खंडोबा महाराज यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:18 PM2020-01-23T23:18:11+5:302020-01-24T00:37:24+5:30
चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराज यात्रेची बुधवारी सांगता झाली. मंदिरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली. पूजा व आरती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व बापू अहिरे यांनी केली.
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराज यात्रेची बुधवारी सांगता झाली. मंदिरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली. पूजा व आरती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व बापू अहिरे यांनी केली.
भंडारा व खोबऱ्याची उधळण आणि मंदिर परिसरात येळकोट-येळकोट जय मल्हारचा गजर करीत सवाद्य पालखी मिरवणूक काढून मुखवटे घरी नेण्यात आले. साहेबराव सूर्यवंशी यांच्या घराजवळ महापूजा व महाप्रसाद झाला. मिरवणुकीनंतर कौतिक अहिरे यांच्या घरी मुकुट ठेवण्यात आला. गेल्या आठवड्यात यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली. सुमारे ५५ हजार भाविकांनी यात्रेत हजेरी लावली. मुखवटे वर्षभर आहिरे यांच्या घरी राहतील. यात्रोत्सव सुरू झाल्यानंतर १२ दिवस मंदिरात देवाचे मुखवटे ठेवले जातात. प्रसाद, फुलहार, शेव रेवडी, सौंदर्यप्रसादणे, पाळणे, खेळणी व मनोरंजनाची साधने आदि दुकाने रविवार पर्यंत सुरू राहतील. खंडेराव महाराज, म्हाळसा व बाणूबाईचे मुखवटे घरी नेण्यात आली असून तरी यात्रा चार-पाच दिवस सुरू राहते. यात्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भंडारा व खोबºयाची उधळण करण्यात आली. यात्रेत सुमारे नऊशेहून अधिक दुकाने थाटली गेली होती. दररोज लाखो रुपयांची उलाढाल झाली.