तापमान ३६ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:48 AM2019-03-20T01:48:19+5:302019-03-20T01:50:02+5:30

मार्च महिन्याच्या पंधरवड्यात ऊन-सावलीचा सुरू असलेला खेळ, रात्री आणि पहाटेचा गार वारा यामुळे सुसह्य वाटणारा मार्च आता तापण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वेकडेली उष्ण वाऱ्यांमुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी नाशिकचे तापमान ३६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

Temperature is 36 degrees | तापमान ३६ अंशांवर

तापमान ३६ अंशांवर

googlenewsNext
ठळक मुद्देउन्हाची तीव्रता : आठ दिवसांत पारा वाढण्याची शक्यता

नाशिक : मार्च महिन्याच्या पंधरवड्यात ऊन-सावलीचा सुरू असलेला खेळ, रात्री आणि पहाटेचा गार वारा यामुळे सुसह्य वाटणारा मार्च आता तापण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वेकडेली उष्ण वाऱ्यांमुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी नाशिकचे तापमान ३६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. येत्या आठ दिवसांत पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात उन्हाची लहर निर्माण झाली असल्याने राज्य तापण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये पारा ३५ च्या पुढे नोंदला गेला. ३५ अंशांच्या जवळपास असलेला नाशिकचा पारा मंगळवारी ३६ अंशांपर्यंत पोहचला. यामुळे नाशिककरांना उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी थंड वाºयाचा दिलासा मिळाला असला तरी सकाळी १० वाजेपासून उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवली. दुपारनंतर तर शहरात उन्हाची तीव्रता जाणवल्याने दैनंदिन व्यवहारावर काहीसा परिणाम जाणवला. सोमवारी नाशिकचे तापमान ३५.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते, तर मंगळवारी यामध्ये वाढ होऊन पारा ३६.६ अंशांपर्यंत पोहचला.
दुसऱ्यांदा पारा ३५ अंशांपुढे
नाशिककरांना उन्हाचा चटका बसण्यास प्रारंभ झाला असून आठवड्यात दोनदा पारा ३५ अंशांच्या पुढे सरकला़ गेल्या शनिवारी ३६.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती़ त्यानंतर सोमवारी ३५.५ असा पारा घसरला़ मंगळवारी पुन्हा त्यात मोठी वाढ झाली़

Web Title: Temperature is 36 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.