तापमान चाळीशीपुढे; शहर पुन्हा तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:29 PM2019-05-21T18:29:01+5:302019-05-21T18:29:32+5:30

चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत.

Temperature ahead of cholera; The city recoiled | तापमान चाळीशीपुढे; शहर पुन्हा तापले

तापमान चाळीशीपुढे; शहर पुन्हा तापले

Next
ठळक मुद्देवर्दळीच्या रस्त्यांवरही शुकशुकाट

नाशिक : हंगामाच्या अखेरीस शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला आहे. दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे स्थिरावत असल्याने शहर पुन्हा तापल्याचे चित्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उन्हच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत.
चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले; मात्र सोमवारी पारा चाळीशीपार सरकला तसेच मंगळवारी (दि.२१) ४०.१ अंशापर्यंत कमाल तापमान पोहचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानही वाढल्याने रात्रीदेखील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. किमान तापमान मंगळवारी थेय २३.४ अंशावर पोहचले. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना वाढत्या तापमानाच्या सामना करावा लागत आहे. उन्हाच्या झळांमुळे दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी नागरिक घराबाहेर पडत असून उद्याने बाळगोपाळांच्या गर्दीने फुलत आहे. दिवसभराचा उष्मा आणि उकाड्याचा त्रासापासून दिलासा मिळविण्यासाठी नाशिककर सायंकाळ होताच गोदापार्क परिसरात रम्य वातावरणात फेरफटका मारण्यासाठी हजेरी लावताना दिसून येत आहे. उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे असल्याचे शाहरातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

यावर्षी तीव्र उन्हाळा
नाशिककरांना यावर्षी थंडीसह उन्हाचाही तडाखा सर्वाधिक सहन करावा लागला. यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामात
दहा वर्षांचा विक्रम मोडला मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानापेक्षा अधिक जास्त तापमान मागील महिन्यात २७ तारखेला४२.७ अंश इतके नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते.

आठवड्याचे कमाल तापमान असे..
सोमवार (दि.१३) - ३८.४
मंगळवार (दि.१४) -३७.८
बुधवार (दि.१५) - ३६.३
गुरूवार (दि.१६) - ३६.१
शुक्रवार (दि.१७) - ३७.३
शनिवार (दि.१८) - ३८.९
रविवार (दि.१९) - ३९.२
सोमवार (दि.२०) - ४०.३
मंगळवार (दि.२१) - ४०.१

Web Title: Temperature ahead of cholera; The city recoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.