निफाडला ८.२ अंश सेल्सिअस तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 08:49 PM2020-12-21T20:49:55+5:302020-12-22T00:31:29+5:30
निफाड : तालुक्यात थंडी वाढत चालली असून सोमवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला होता.
निफाड : तालुक्यात थंडी वाढत चालली असून सोमवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला होता.
मागील काही दिवसात या तालुक्यात ढगाळ वातावरण होते, मात्र गेल्या २ ते ३ दिवसापासून या तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. सोमवारी (दि.२१) या तालुक्यात ८.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळी शेतकरी, ऊसतोड कामगार यांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. सोमवारी सायंकाळी थंडीचे प्रमाण वाढत चालले होते. थंडीचे प्रमाण वाढत गेल्यास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी दुसऱ्यांदा येवढेच तापमान होते.