तपमानाचा पारा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:36+5:302021-05-23T04:13:36+5:30
नाशिक : तौक्ते वादळामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी ढगाळ हवामान निर्माण झाल्यामुळे शहरातील तपमान कमाल २८ .२ ...
नाशिक : तौक्ते वादळामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी ढगाळ हवामान निर्माण झाल्यामुळे शहरातील तपमान कमाल २८ .२ अशं सेल्सिअशपर्यंत घसरले होते. परंतु, वादळाचा प्रभाव ओसरताच कमाल तपमानाचा पारा पुन्हा ३४.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढवा आहे. ---
कलिंगडाला मागणी वाढली
नाशिक : शहरातील तपमान वाढल्याने नागरिकांकडून रसवर्गीय फळांसोबत पाणीदार फळांना मागणी वाढली असून पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या कलिंगडाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. कलिंगडसोबत, खरबूज, संत्री, अशा फळांनाही नागरिकांची पसंती मिळत आहे.
---
रस्त्यांवर वर्दळ वाढली
नाशिक : शहरात लॉकडाऊनचे कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू असतानाही विविध रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. विशेष म्हणजे भद्रकालीतील दुधबाजार, मुंबई नाका, एमजी रोड परिसरात नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. या भागातील बाजारपेठ बंद असतानही नागरिकांची गर्दी होत आहे.
--
दुभाजकांची दुरावस्था
नाशिक : इंदिरानगर- पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकाची दुरावस्था झाली आहेे. दुभाजकावरील शोभेच्या फुलांची रोपे वाळून गेली असून त्याजागेवर गवत उगवले आहे. हे गवत काढून फुलांची पुर्नलागवड करण्याची गरज व्यक्त होत आहे.
---