सांडपाण्यामुळे मंदिराचा मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 05:52 PM2020-01-15T17:52:29+5:302020-01-15T17:58:37+5:30
लोहोणेर : वासोळ रस्त्यावरील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिराला परिसरातील सांड पाण्याने विळखा घातला असून हे पाणी अक्षम दुर्लक्ष मुळे थेट मंदिरात घुसले आहे. शिवाय हे पाणी पुढे वाहत जाऊन थेट पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जात आहे.
लोहोणेर : वासोळ रस्त्यावरील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिराला परिसरातील सांड पाण्याने विळखा घातला असून हे पाणी अक्षम दुर्लक्ष मुळे थेट मंदिरात घुसले आहे. शिवाय हे पाणी पुढे वाहत जाऊन थेट पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जात आहे.
या सांडपाण्यामुळे गेल्या महिन्यापासून मंदिराचे आत प्रवेशद्वार ओलांडणे ही बंद झाले आहे. लोहोणेर येथील जुन्या ऐतिहासिक वारसा असलेल्या गडी वस्ती जवळ गिरणा नदीच्या काठावर पुरातन काळापासूनची हेमाडपंथी महादेवाची दोन मंदिर आहेत. यातील एक मंदिर गिरणातीरी तर दुसरे मालेगाव रस्त्यावर आहे.
या मंदिराच्या मागील बाजूस गेल्या महिन्यापासून परिसरातील एका शेतकऱ्याच्या पाईपलाईनला गळती लागली असल्याचे निदर्शनास आले. मात्र या गळतीकडे संबंधित शेतकऱ्यांने दुर्लक्ष केले असल्याने मंदिराच्या पाठीमागे मोठेपाण्याचे तळे साचले असून आता हे पाणी थेट मंदिरात प्रवेश करते झाले आहे.
यामुळे येथे गटारगंगा निर्माण झाली असून सदरचे पाणी लोहोणेर गावास पाणी पुरवठा करणाºया विहिरीकडे प्रवाहित झाले असून या रस्त्यावर चोवीस तास पाणीच पाणी असल्याने पादचारी वर्गास मोठा त्रास होत आहे.
लोहोणेर येथून गिरणा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात विहिरी खोदून परिसरातील गावातील शेतकºयांनी विहिरी खोदून पाईपलाईनद्वारे आपापल्या शेतात पाणी नेले आहे. मात्र विहिरीतच इतके पाणी आहे, की या वाया जाणाºया पाण्याकडे कोण लक्ष घालतो अशी अवस्था झाली आहे.
या अक्षम दुर्लक्षचे चित्र लोहोणेर गावाच्या बाहेरून जाणार्या रस्त्यावर चोवीस तास विविध ठिकाणी वाहत असलेल्या पाईपलाईनच्या गळतीच्या पाण्यावरून सिद्ध होते आहे. यामुळे लोहोणेर गावात दुर्गंधी वाढली असून लोहोणेरकराचे आरोग्य धोक्यात आले आहे.