देवस्थानांच्या दानपेट्या मंगळवारी उघडणार

By admin | Published: November 12, 2016 02:17 AM2016-11-12T02:17:12+5:302016-11-12T02:19:10+5:30

देवस्थानांच्या दानपेट्या मंगळवारी उघडणार

Temple gates to open on Tuesday | देवस्थानांच्या दानपेट्या मंगळवारी उघडणार

देवस्थानांच्या दानपेट्या मंगळवारी उघडणार

Next

विजय मोरे नाशिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि़ ८) रात्री पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले़ या निर्णयामुळे देशभरातील देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये काळा पैसा अथवा रद्द केलेल्या नोटा भाविकांनी दान केल्याची शक्यता गृहीत धरून नाशिक विभागातील वादग्रस्त देवस्थानांमधील दानपेट्या मंगळवारी (दि़ १५) सहायक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर उघडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे़
भारतीय चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्याने या नोटा बदलून घेण्यासाठी बँका तसेच पोस्ट आॅफिसमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत़ तर बाजारात बेहिशेबी वा काळा पैसा बाळगणारे तसेच भाविकांकडून देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा दान करण्याची शक्यता आहे़ देवस्थानांच्या या दानपेट्यांमध्ये दानरूपी मिळालेल्या नोटा बाहेर काढण्यासाठी दानपेटी उघडावी लागणार आहे़ विश्वस्तांमध्ये वाद नसलेल्या देवस्थानांमधील दानपेट्या सर्वसंमतीने उघडल्या जाऊन त्यातील रक्कम देवस्थानच्या खात्यावर भरण्यात येणार आहे़
नाशिकच्या सह धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांतील देवस्थाने आहे़ त्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यात सुमारे दीड हजार देवस्थाने असून त्यापैकी चार देवस्थानांमधील विश्वस्तांमध्ये वाद सुरू असल्याने तेथील दानपेट्या सील करण्यात आल्या आहेत़ औरंगाबाद जिल्ह्यातील सह धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी (दि़ ११) देवस्थानांच्या दानपेट्या सील करण्याचे आदेश दिले़; मात्र नाशिकमध्ये अशा कुठल्याही प्रकारचे आदेश देण्यात आलेले नाहीत़
दरम्यान, राज्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे हे शुक्रवारी (दि़ ११) नाशिकमध्ये आले असून, त्यांनी दानपेट्या सील करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत़ वादग्रस्त देवस्थानांच्या सील केलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी मंगळवारी या दानपेट्या उघडण्यात येणार आहेत़

Web Title: Temple gates to open on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.