उद्या पहाटेपासून गजबजणार ग्रामदेवता कालिकामातेचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:17 PM2018-10-09T17:17:07+5:302018-10-09T17:17:25+5:30

नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे महाआरती, सकाळी काकड आरती, मान्यवरांच्या हस्ते महापूजा-महाआरतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी नैवेद्य, रात्री महाआरती असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहे

Temple of Gramdev Kallikamate to be torn from tomorrow morning | उद्या पहाटेपासून गजबजणार ग्रामदेवता कालिकामातेचे मंदिर

उद्या पहाटेपासून गजबजणार ग्रामदेवता कालिकामातेचे मंदिर

Next
ठळक मुद्दे नवव्या माळेलाच दसरा साजरा होत आहे.

नाशिक : ग्रामदेवता श्री कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (दि.१०) प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी पहाटे विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. तसेच सकाळी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्री कालिका देवीची महापूजा तर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे महाआरती, सकाळी काकड आरती, मान्यवरांच्या हस्ते महापूजा-महाआरतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी नैवेद्य, रात्री महाआरती असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सप्तमीला घागर फुंकण्याचा कार्यक्रम, अष्टमीला विश्वस्तांच्या हस्ते यज्ञ,  होम हवन केले जाणार आहे. यावर्षी नवमी-दशमी एकत्र आल्याने तीथीत घट झाली आहे . त्यामुळे नवव्या माळेलाच दसरा साजरा होत आहे. श्रींची नित्यआरती, पुजा करु न दुपारी विश्वस्तांच्या हस्ते शस्त्रपुजा करण्यात येईल. सायंकाळी पाच सीमोल्लंघन होईल, या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Temple of Gramdev Kallikamate to be torn from tomorrow morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.