मंदिरे बंद; घरासमोरच हरितालिकेची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:46 PM2020-08-21T23:46:16+5:302020-08-22T01:11:58+5:30

ब्राह्मणगाव : हरितालिका म्हटली की सुवासिनींची शिवमंदिरात पूजेसाठीची धावपळ पहायला मिळते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व प्रशासनानेही गर्दी न करण्याचे आदेश दिल्याने सुवासिनींनी घरासमोरच हरितालिकेचे पूजन केले.

Temples closed; Worship of greenery in front of the house | मंदिरे बंद; घरासमोरच हरितालिकेची पूजा

मंदिरे बंद; घरासमोरच हरितालिकेची पूजा

Next


कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने ब्राह्मणगाव येथे घरासमोर हरितालिकेचे पूजन करताना सुवासिनी.

ब्राह्मणगाव : हरितालिका म्हटली की सुवासिनींची शिवमंदिरात पूजेसाठीची धावपळ पहायला मिळते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व प्रशासनानेही गर्दी न करण्याचे आदेश दिल्याने सुवासिनींनी घरासमोरच हरितालिकेचे पूजन केले. सुवासिनींनी दरवर्षीप्रमाणे हरितालिका व्रत केले. लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरे बंद असल्याने सुवासिनींनी आपापल्या दाराशीच पूजेची मांडणी करून हरितालिका व्रताचे पूजन केले. यावर्र्षी गणरायाचे आगमनही साध्या पद्धतीने होणार आहे. गावातील सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना न करण्याचे ठरवले आहे. गावातील हेरंब गणेश मंदिरात गणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीलासुद्धा महिलांना घरीच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Temples closed; Worship of greenery in front of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.