टेम्पो ट्रॅव्हलर उलटून अकरा भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:29 AM2018-11-24T01:29:56+5:302018-11-24T01:30:12+5:30

त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांची भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर महिरावणी येथील एका शेतात उलटून झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशातील ११ भाविक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास घडली़

Tempo traveler injured in eleven hurt | टेम्पो ट्रॅव्हलर उलटून अकरा भाविक जखमी

टेम्पो ट्रॅव्हलर उलटून अकरा भाविक जखमी

Next
ठळक मुद्देमहिरावणीजवळ झाला अपघात

नाशिक : त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांची भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर महिरावणी येथील एका शेतात उलटून झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशातील ११ भाविक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास घडली़ असिम आयुब शेख (३५, रा. काझीपुरा, सिन्नर), लता सिंग (६०), विश्वनाथ सिंग (७०), शालिनी सिंग (३०), शैला सिंग (३०), निशन सिंग (दोन महिने), दशसिंग (दीड वर्षे), अधान सिंग (१०), अधन सिंग (९), विष्णू सिंग (६०), चंद्रेश कुमारी (७०, रा. सर्व उत्तर प्रदेश) अशी जखमींची नावे असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे़ दरम्यान, नऊ भाविकांवर जिल्हा रुग्णालय तर उर्वरित दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील एकाच कुटुंबातील सदस्य शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते़ यानंतर त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी त्यांनी शिर्डीतून खासगी टेम्पो ट्रॅव्हल बस केली होती़ त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन नाशिकला येत असताना सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास महिरावणी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती संदीप फाउंडेशनसमारील शेतात जाऊन उलटली़ या बसमधील वीसपैकी ११ जण जखमी झाले असून, चालक व एक बालक गंभीर जखमी झाले आहे़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
चालक गंभीर जखमी
या अपघाताची माहिती मिळताच महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले होते़ या अपघातात चालक शेख व एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली़

Web Title: Tempo traveler injured in eleven hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.