मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:20 AM2018-09-16T01:20:30+5:302018-09-16T01:20:45+5:30
मराठा समाजाच्या आंदोलनानंतर नाशिक शहरात समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मेरीच्या जागेत तात्पुरते वसतिगृह उभारण्यात आले आहे. १२० विद्यार्थी क्षमतेच्या या वसतिगृहाची पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. या वसतिगृहासाठी येत्या आठ दिवसांत प्रवेश देण्यात येतील, त्याचप्रमाणे लवकरच गंगापूररोडवरील नियोजित जागेवर कायमस्वरूपी वसतिगृह उभारण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर नाशिक शहरात समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मेरीच्या जागेत तात्पुरते वसतिगृह उभारण्यात आले आहे. १२० विद्यार्थी क्षमतेच्या या वसतिगृहाची पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. या वसतिगृहासाठी येत्या आठ दिवसांत प्रवेश देण्यात येतील, त्याचप्रमाणे लवकरच गंगापूररोडवरील नियोजित जागेवर कायमस्वरूपी वसतिगृह उभारण्यासाठी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
पंचवटीत दिंडोरी रोडवर मेरी येथील जागेत बंद असलेल्या चार निवासी इमारतींचे नूतनीकरण करण्यात आले असून, याठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या निवासाची तात्पुरती सोय करण्यात येणार आहे. मराठा समाजाने आंदोलन केल्यानंतर अशाप्रकारचे शहरात वसतिगृह असावे, अशी मागणी पुढे आली होती. त्यासाठी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जागेचा शोध घेतला असता दिंडोरीरोडवर महाराष्टÑ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वापराविना पडून असलेल्या चार इमारती निवडल्या आणि त्यावर गेल्या महिनाभरापासून मेहनत घेऊन नूतनीकरण करण्यात आले आहे. राजर्षी शाहू वसतिगृह असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, शनिवारी (दि.१५) त्याची पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. या इमारतीत १२० मुलांची निवासाची सोय होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी अर्ज मागवले असून, आठ दिवसांत प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् तसेच करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप, चेतन शेलार, विशाल पाटील, नीलेश शेलार, विशाल पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दीड वर्षात नवे वसतिगृह
च्शासनाने गंगापूर रोडवर आठ हजार चौरस मीटर जागेत वसतिगृह साकारण्यासाठी मंजुरी दिली असून दीड वर्षात त्याचे काम पूर्ण होईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. म्हसरूळ येथील साठ एकर जागा देण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला होता. मात्र मध्यवर्ती जागा असावी असे अनेकांचे म्हणणे असून त्यादृष्टीने जागा निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
च्सदरच्या वसतिगृहाबाबत कोणत्याही प्रकारे आमदारांनी मदत केली नाही किंवा त्यांना मेरी येथील वसतिगृहाचा विषयच माहिती नव्हता. शनिवारी (दि.१५) याठिकाणी मुख्यमंत्री भेट देणार असल्याचे कळाल्यानंतर शुक्रवारी (दि.१४) या ठिकाणी आमदारांनी भेटी दिल्या, असे समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच यासाठी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.