मालेगावी तेरा ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 11:31 PM2021-09-13T23:31:54+5:302021-09-13T23:37:49+5:30
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने दोन कायम गणेश कुंडांसह तेरा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात ...
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने दोन कायम गणेश कुंडांसह तेरा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात विसर्जन कुंड उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. नागरिकांनी महापालिकेने उभारलेल्या गणेश कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.
कोरोना नियमांचे पालन करून व गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेने महादेव घाट, वाल्मीकनगर शाळा, टेहरे चौफुलीवरील गिरणा नदीपात्र, सोयगाव अग्निशमन केंद्र, अंबिका कॉलनीतील अंबिका मंदिर, गोळीबार मैदान, संभाजीनगर, पुष्पाताई हिरेनगर, भायगाव गावठाण नदी, कलेक्टरपट्टा भागातील महारुद्र हनुमान परिसर, द्याने फरशी पूल, छत्रपती शिवाजी महाराज जिमखाना, कॅम्प गणेशकुंड आदी ठिकाणी तात्पुरते गणेश विसर्जन कुंड तयार केले जाणार आहेत, तर दरेगाव, सायने, म्हाळदे या ठिकाणी पारंपरिक ठिकाणी गणेश विसर्जन केले जाणार आहे. नागरिकांनी सोयीनुसार जवळच्या विसर्जनस्थळी मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.