घोटी-भंडारदरा रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:36 PM2020-09-30T16:36:10+5:302020-09-30T16:37:10+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील घोटी- पिंपळगाव मोर ते वासाळी या भंडारदरा रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे वाताहत झाली असून घोटी ते भंडारदरा या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत असली तरी पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंत

Temporary repair of Ghoti-Bhandardara road | घोटी-भंडारदरा रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती

घोटी-भंडारदरा रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती

Next
ठळक मुद्देपिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंतच्या खड्यांचे साम्राज्य

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील घोटी- पिंपळगाव मोर ते वासाळी या भंडारदरा रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे वाताहत झाली असून घोटी ते भंडारदरा या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत असली तरी पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य असल्याने या परिसरातील प्रवासी करण्यात येत आहे.
घोटी-भंडादरा या क्र मांक २३ च्या राज्यमार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. अनेक वेळा या रस्त्यावर छोटे मोठे अपघात पण झाले आहे. हा रस्ता किमान दुरु स्ती तरी करावा व खड्डे तरी भरावेत यासाठी टाकेद गटातील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने या रस्त्याची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या रस्त्याची तात्पुरती डागडुजी फक्त नावालाच झाली. ही बाब आमदार माणिक कोकाटे यांनी लक्ष्यात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने घोटी-भंडारदरा राज्यमार्ग क्र मांक २३ या रस्त्याची त्वरित दुरु स्ती करण्यात यावी या मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण-मुंबई मुख्य अभियंता यांना व सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता नाशिक यांना दिले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र .१ इगतपुरीचे अभियंता कौस्तुभ पवार यांना विचारणा केली असता आशीयाई बँकेच्या अर्थसहाय्यातून सदर रस्त्याची लवकरच दुरु स्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घोटी-भंडारदरा रस्त्याचे काम मंजुर झालेले असून संपुर्ण रस्ता हा सिमेंट काँक्र ीटीकरणाचा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांचेकडून मी स्वत: आग्रह धरु न तात्काळ तांत्रिक मान्यता घेऊन लगेचच निविदा काढुन एक मिहन्याच्या आत या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरु वात करणार आहे.
- माणिक कोकाटे, आमदार,सिन्नर.

अनेक वर्षांपासून टाकेद गटातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याची दुरु स्ती तातडीने करावी. किमान खड्डे तरी बुजवावे यासाठी स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात होते, परंतु आमदार कोकाटे यांनी याची वेळीच दखल घेतली व संबंधित प्रशासनाला पिंपळगाव ते वासाळीपर्यंतचा रस्ता काँक्र ीटीकरण करण्यात यावा या मागणीचे पत्रव्यवहारही केला असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरु वात करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
- राम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: Temporary repair of Ghoti-Bhandardara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.