ध्वनिक्षेपकासाठी दहा दिवसांची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:35 AM2017-08-26T00:35:28+5:302017-08-26T00:35:33+5:30
न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्यास चालू वर्षी पंधरा दिवसांची मुभा दिली असून, त्यातील पाच दिवस आजपावेतो संपुष्टात आले असले तरी, उर्वरित दहा दिवसांपैकी कोणत्या सण, उत्सवांच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा द्यायची ते ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुखांकडून जिल्हाधिकाºयांनी अहवाल मागविला आहे.
नाशिक : न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्यास चालू वर्षी पंधरा दिवसांची मुभा दिली असून, त्यातील पाच दिवस आजपावेतो संपुष्टात आले असले तरी, उर्वरित दहा दिवसांपैकी कोणत्या सण, उत्सवांच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा द्यायची ते ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुखांकडून जिल्हाधिकाºयांनी अहवाल मागविला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, वाद्य, फटाके वाजविण्यास निर्बंध घातलेले आहेत, मात्र सण, उत्सव लक्षात घेता काही दिवसांसाठी न्यायालयाने हे निर्बंध शिथिल केले आहेत. या काळात दरवर्षी रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य, ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला जातो. यंदा मात्र पाच दिवस अतिरिक्तदेण्यात आले आहेत. त्यामुळे पंधरा दिवसांपैकी पाच दिवस आॅगस्टपर्यंत संपलेले असून, उर्वरित दहा दिवस आगामी चार महिन्यांत वापरावयाचे आहेत. मात्र ते दिवस नेमके कोणते हे शासनाने निश्चित केलेले नाहीत. ते ठरविण्याचा अधिकार यंदा जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. जेणे करून त्या त्या भागातील सण, उत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपकाची मर्यादा जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात शिथिल करू शकतील. राज्य सरकारचे आदेश दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी नाशिक पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन आगामी कोणत्या सण, उत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविण्याची मर्यादा शिथिल करावी त्याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ख्रिसमस, ३१ डिसेंबर या सणांच्या कालावधीत रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची अनुमती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.