दहा दिवसांनंतर रेशन दुकानदारांचा संप स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:44 AM2017-08-11T00:44:33+5:302017-08-11T00:44:57+5:30
गेल्या दहा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेला रेशन दुकानदारांचा संप अखेर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. गणेशोत्सव, बैलपोळा, गोपाळकाळा यांसह अन्य सण आल्याने गोरगरिबांची गैरसोय नको म्हणून, हा संप स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
नाशिक : गेल्या दहा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेला रेशन दुकानदारांचा संप अखेर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. गणेशोत्सव, बैलपोळा, गोपाळकाळा यांसह अन्य सण आल्याने गोरगरिबांची गैरसोय नको म्हणून, हा संप स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाने १० आॅगस्टनंतर संप सुरू राहिल्यास रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सणासुदीचे कारण देत हा संप मागे घेण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राज्यातील रेशन दुकानदारांचा संप सुरूच आहे. रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ आॅगस्टपासून रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला होता. दहा दिवसांपासून संप सुरू असल्याने विशेषत: ग्रामीण भागात गोरगरिबांना रेशनचे धान्य मिळणे अवघड झाले होते. मात्र गुरुवारी (दि.१०) आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा खात्याच्या विनंतीनुसार तसेच गोरगरिबांची ऐन सणासुदीच्या काळात गैरसोय नको, या कारणांमुळे संप तूर्तास मागण्या कायम ठेवून स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, प्रल्हाद जाधव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यामुळे गोर गरीबांचे मात्र गैरसोय टळणार आहे.