राष्ट्रीय अधिवेशानासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुट्टी;शिवाजी पाटील यांची नाशिक जिल्हा मेळाव्यात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 06:44 PM2019-01-27T18:44:49+5:302019-01-27T18:46:29+5:30

गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाºया प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.

Ten days pay leave for teachers for National Convention; Shivaji Patil's visit to Nashik District Melawa | राष्ट्रीय अधिवेशानासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुट्टी;शिवाजी पाटील यांची नाशिक जिल्हा मेळाव्यात माहिती

राष्ट्रीय अधिवेशानासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुट्टी;शिवाजी पाटील यांची नाशिक जिल्हा मेळाव्यात माहिती

Next
ठळक मुद्देगोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी नाशिक जिल्हयात प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले मार्गदर्शन

नाशिक : गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ् राष्ट्रीय शिक्षण परिषद व प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.
नाशिकमधील भाजपाच्या वसंतस्मृती या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे  रविवारी (दि.२७) घेण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. शिवाजी पाटील म्हणाले, गोव्यात  पणजी येथे ४ ते १३ फेबु्रवारी दरम्यान प्राथमिक शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून या अधिवेशानात सुमारे दहा लाख शिक्षक सहभागी होणार आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांना दहा दिवसाची विशेष नैमित्तिक पगारी रजा मंजूर केली आहे. तसेच अधिवेशनासाठी रेल्वे तिकीटावर विशेष सवलत दिल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून भारतरत्न सचिन तेंडूलकरलाही आमंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलताना एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने बहुतांश शिक्षकांच्या वेतनातील २ लाख रुपयांची रक्कम थांबविण्यात आली असून ही रक्कम त्यांना तत्काळ परत करण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी शिक्षक संघाची आग्रही भूमिका असून शिक्षणमंत्र्यांकडे यासाठी मागणी करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिले. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, सरचिटणीस केशव जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रवींद्र पिंगळे, धैर्यशिल पाटील, हनुमंत शिंदे,अशोक ठाकरे, नथू देवरे, जिभाऊ आहिरे, सुभाष अहिरे, उपस्थित होते.

Web Title: Ten days pay leave for teachers for National Convention; Shivaji Patil's visit to Nashik District Melawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.