दहा दिवसात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाचवरून पोहचला दीड टक्क्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 01:42 AM2021-06-19T01:42:50+5:302021-06-19T01:43:58+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असून, त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याने जिल्ह्यात रूग्ण व संसर्गात येणाऱ्यांमध्ये लागण होण्याच्या प्रकारात दहा दिवसात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ५.०४ असलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता १.६७ टक्क्यावर आला आहे.
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असून, त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याने जिल्ह्यात रूग्ण व संसर्गात येणाऱ्यांमध्ये लागण होण्याच्या प्रकारात दहा दिवसात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ५.०४ असलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता १.६७ टक्क्यावर आला आहे.
एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत पोहोचून, मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. बेडची कमतरता निर्माण होऊन रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फरपट झाली होती. जून महिन्यात रूग्ण संख्या कमी होऊन पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून नाशिक, मालेगाव क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातील रूग्ण संख्येत घट होऊन पॉझिटिव्हिटीच्या दरात घसरण झाली आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी सात हजार कोरोना रुग्णांची चाचणी केली जात असून, त्यापैकी दीडशे ते दोनशे रूग्ण बाधित सापडू लागले आहेत. ८ जून रोजी ५,२६१ रूग्ण संख्या आता ३,४७७ पर्यंत घरसली तर पॉझिटिव्हिटीचा रेट ५.०४ वरून १.६७ पर्यंत पोहोचला आहे. नाशिक क्षेत्रात १.७६, ग्रामीण भागात १.४० व मालेगाव क्षेत्रात ०.३३ टक्के इतका रेट आहे.