राष्ट्रीय अधिवेशनासाठी शिक्षकांना दहा दिवस पगारी सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:34 AM2019-01-28T00:34:50+5:302019-01-28T00:35:58+5:30
गोव्यात फे ब्रुवारी महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकारने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुटी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.
नाशिक : गोव्यात फे ब्रुवारी महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकारने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुटी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.
नाशिकमधील भाजपाच्या वसंतस्मृती या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे रविवारी (दि.२७) घेण्यात आलेल्या जिल्हा मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. शिवाजी पाटील म्हणाले, गोव्यात पणजी येथे ४ ते १३ फेबु्रवारी दरम्यान प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे राष्ट्रीय शिक्षण परिषद व शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशानात देशभरातून सुमारे दहा लाख शिक्षक सहभागी होणार असून, अधिवेशनासाठी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षकांना दहा दिवसांची विशेष नैमित्तिक पगारी रजा मंजूर केली आहे. तसेच अधिवेशनासाठी रेल्वे तिकिटावर विशेष सवलत दिल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनास केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून, भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी ेसांगितले.
यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, सरचिटणीस केशव जाधव, महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रवींद्र पिंगळे, धैर्यशील पाटील, हनुमंत शिंदे, अशोक ठाकरे, नथू देवरे, जिभाऊ आहिरे, सुभाष अहिरे उपस्थित होते.
शिक्षकांचे संगणक प्रशिक्षण अपूर्ण
शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलताना एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने बहुतांश शिक्षकांच्या वेतनातील दोन लाख रुपयांची रक्कम थांबविण्यात आली असून, ही रक्कम त्यांना तत्काळ परत करण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी शिक्षक संघाची आग्रही भूमिका असून, शिक्षणमंत्र्यांकडे यासाठी मागणी करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिले.