एक एकर डाळिंबातून दहा लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 12:35 AM2021-09-01T00:35:06+5:302021-09-01T00:35:51+5:30
जळगाव नेऊर : गेली अनेक दिवसांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असून कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग, मर रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालवली, पण येथील शांताराम शिंदे या तरुण शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खारवट जमिनीवर डाळिंब बाग फुलवून सलग दुसऱ्या वर्षी डाळिंब बागेतून दहा लाखांचे उत्पन्न घेतले.

शिंदे यांच्या डाळिंब बागेच्या एका कॅरेटला पाच हजार शंभर, एकतीशे रुपये, एकशेवीस रुपये भाव मिळाल्याने त्यांनी डाळिंब बागेसाठी केलेली मेहनत फळाला आली असून यावर्षीही त्यांना दहा लाखाच्या आसपास उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
शिंदे यांची जळगाव नेऊर येथे वडिलोपार्जित अडीच एकर शेती असून एक एकर क्षेत्रावर डाळिंब बाग असुन दीड एकरावर मका लागवड केली आहे, पहिल्या वर्षी अडीच लाख उत्पन्न मिळाले. तर दुसऱ्या वर्षी दहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. यावर्षीही त्यांना दहा लाखांच्या आसपास उत्पन्न मिळणार आहे,
यावर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा कसोटीचा काळ होता. या कसोटीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागेवर नांगर चालवला, पण शिंदे यांनी यावर मात करून कृषी सेवा केंद्र चालकाच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करून एक एकरात ४०० झाडांपासून आतापर्यंत सात लाख रुपये उत्पन्न मिळविले असून अजून बागेची विक्री चालू असून दहा लाखांच्या आसपास उत्पादन मिळण्याची आशा आहे.
डाळिंब नाशिक येथे विक्री केला जातो. त्यातून एक ते दीड लाख रुपये खर्च झालेला असून परिसरातील तरुण शेतकऱ्यांना एक आदर्श आहे.
माझी वडिलोपार्जित अडीच एकर जमीन असून याअगोदर द्राक्ष, कांदा पिके घेऊन बघितली, पण जमीन खारवट असल्याने पाहिजे तसे उत्पादन निघत नव्हते, त्यामुळे एक एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली. तर दीड एकरावर खरिपाची पिके मका, सोयाबीन घेत असतो. गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबातून योग्य नियोजन करून डाळिंबातून या वर्षी दहा लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
- शांताराम शिंदे, शेतकरी
कॅरेटमधील डाळिंब.