पाटणे परिसरातील दहा जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:00 PM2020-07-16T22:00:27+5:302020-07-17T00:07:25+5:30
पाटणे : येथील १२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १० रुग्ण कोरोना विषाणूवर मात करून घरी परतल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दाभाडी येथील कोविड केअर सेंटर येथे एकूण १२ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी आधी तीन कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यानंतर पुन्हा सात रुग्ण बरे झाल्याने पाटणे येथील कोरोनाचे संकट टळले.

आरोग्य विभागाच्या वतीने तसेच नातेवाइकांनी टाळ्या वाजवून व पुष्प देऊन स्वागत केले. येथील प्रथम बाधित रुग्णांच्या कुटुंबातील २ व नातेवाईक ५ असे एकूण ७ रुग्ण बरे झाल्याने पाटणे येथील ग्रामस्थ चिंतामुक्त झाले आहेत. आता ७५ वर्षाची महिला व ४२ वर्षाचा युवक या दोनच रुग्णांवर दाभाडी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सारिका मेरगळ, आरोग्यसेविका सुरेखा देवरे, आरोग्यसेवक अरुण पाटील यांनी दिली आहे. पाटणे गावातील दोन रुग्णही कोरोना विषाणूवर मात करून लवकरच घरी परततील, अशी आशा पाटणेकर बाळगून आहेत.