वंजारवाडी येथे प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकास दहा हजाराची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:07 PM2021-01-28T19:07:16+5:302021-01-28T19:08:29+5:30
नांदूरवैद्य : ग्रामपंचायत वंजारवाडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात येऊन ध्वजपूजन गावातील कोरोना योद्धा आशासेविका श्रीमती रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण गावातील जेष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

वंजारवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी प्रभातफेरी काढत भारत माता की जय, जय हिंद च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांना उजाळा दिला.
यावेळी भारतीय सैन्य दलातील जवान ज्ञानेश्वर शिंदे यांनी देशसेवा करताना सीमेवर केलेल्या पराक्रमाच्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर पुणे येथील नंदकिशोर एकबोटे व समृद्धी एकबोटे यांनी त्यांचे वडील माजी सैनिक स्वर्गीय मधुकर धांदरफळ यांच्या स्मरणार्थ गावातील जेष्ठ माजी सैनिक संतू कातोरे यांना दहा हजार रूपये भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी ग्राम अधिकारी योगेश पगार समवेत नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्य तुकाराम शिंदे, रामहरी शिंदे, माजी उपसरपंच नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.