बलात्काराच्या विरोधात राष्ट्रपतींना दहा हजार पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:48 PM2020-10-03T23:48:37+5:302020-10-04T01:17:44+5:30
नाशिक : हाथसर येथील अत्याचाराच्या घटनेसह महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने शनिवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करण्यात आली. त्याच प्रमाणे राष्ट्रपतींना दहा हजार पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार असून या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला.
नाशिक : हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेसह महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने शनिवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करण्यात आली. त्याच प्रमाणे राष्ट्रपतींना दहा हजार पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार असून या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला.
हाथरस येथील घटना निंदनीय असून एकीकडे बेटी बचाव, बेटी पढावच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे मात्र महिलांच्या अत्याचारात वाढ होत आहे.
त्यामुळे देशात अराजकता निर्माण झाली की काय अशाप्रकारचे चित्र आहे. हाथरस येथील घटना दडपण्याचा प्रयत्न सुरू असून असा प्रयत्न करणारे पोलीस, राज्य सरकार, डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी किरण मोहिते, कृष्णा शिंदे, मोहम्मद सलिम, सिमा खिल्लारे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यानंतर नागरीकांना आवाहन करून राष्ट्रपतींना दहा हजार पत्रे पाठविण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे.