दहा हजार सैनिक मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 09:23 PM2019-10-19T21:23:44+5:302019-10-20T00:59:38+5:30

सैन्य सेवेतील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वेळेत व सुलभरीत्या बजावता यावा यासाठी इटीपीबीएस ही संगणकीय प्रणाली भारत निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९८०७ सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत.

Ten thousand soldiers voters | दहा हजार सैनिक मतदार

दहा हजार सैनिक मतदार

Next
ठळक मुद्देइटीपीबीएस प्रणाली : आॅनलाइन मतपत्रिका पाठविणार

नाशिक : सैन्य सेवेतील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वेळेत व सुलभरीत्या बजावता यावा यासाठी इटीपीबीएस ही संगणकीय प्रणाली भारत निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९८०७ सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत.
आयोगामार्फत तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिकली पोस्टल बॅलेट सिस्टीम संगणक प्रणालीच्या माध्यमातून सैन्य दलातील मतदारांसाठीच्या मतपत्रिका त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी आॅनलाइन पद्धतीने पाठविण्यात येतात. या मतपत्रिका पोचल्यानंतर त्या मतमोजणीच्या दिवसापर्यंत सकाळी ८ वाजेपर्यंत पोस्टाने मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील सैन्य मतदारांच्या मतपत्रिका या गेल्या ७ तारखेलाच रवाना झालेल्या आहेत.
२४ हजार युवक करणार पहिल्यांदाच मतदान
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे सदर मतदारांचे हे पहिले मतदान असणार आहे. या नवीन मतदारांच्या नोंदणीनंतर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आता ४५ लाख ५८ हजार १८६ इतकी झाली आहे. अंतिम मतदारयादी जाहीर होऊनही आयोगाने नवमतदारांसाठी ४ आॅक्टोबरपर्यंत नवमतदारांना नाव-नोंदणीची मुदत दिली होती. या तारखेपर्यंत जिल्ह्यातून सुमारे २४ हजार नवमतदार पुढे आले आहेत.
नाशिक पश्चिममध्ये दोन बॅलेट युनिटचा वापर
४शहरातील नाशिक पश्चिम या मतदारसंघात १९ उमेदवार असल्याने या मतदारसंघात दोन बॅलेट युनिटवर मतदान घेतले जाणार आहे. एखाद्या मतदारसंघात पंधरापेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास अशा ठिकाणी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागतो. त्यानुसार जिल्ह्यात नाशिक पश्चिम या एकमेव मतदारसंघात दोन युनिट वापरण्यात येणार आहे. एका ईव्हीएम मशीनमध्ये पंधरा उमेदवारांचे आणि एक नोटा अशी १६ बटणं असतात. त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास दोन ईव्हीएमची दोन युनिट वापरावी लागणार आहेत. पंधरापेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी दोन बॅलेट युनिट मतदानासाठी वापरले जाणार आहेत.
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
४पासपोर्ट (पारपत्र).
४वाहनचालक परवाना.
४छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्र म).
४सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र.
४छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक.
४पॅनकार्ड.
४राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती, निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड.
४मनरेगा जॉबकार्ड.
४कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड.
४छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज.
४खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र.
४आधारकार्ड.

Web Title: Ten thousand soldiers voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.