दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली जेईई मेन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 06:43 PM2018-04-08T18:43:33+5:302018-04-08T18:43:33+5:30
आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षा रविवारी (दि. 8) एप्रिल रोजी घेण्यात आली. सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक शहरातील 13 केंद्रांवर सुमारे दहा हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयातील प्रश्न विद्यार्थ्यांना सोपे गेले असले तरी गणित विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याच्या प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
नाशिक : आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षा रविवारी (दि. 8) एप्रिल रोजी घेण्यात आली. सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक शहरातील 13 केंद्रांवर सुमारे दहा हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयातील प्रश्न विद्यार्थ्यांना सोपे गेले असले तरी गणित विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याच्या प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
सीबीएसईतर्फे नाशिक शहरातील 13 केंद्रांवर घेण्यात आली. बीई व बी.टेकसाठी अभ्यासक्रमासाठी सकाळी 9.30 ते 12.30 यावेळेत पहिला पेपर घेण्यात आला, तर बी. आर्क , बी. प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते 5 यावेळेत परीक्षा घेण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता शहरातील सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, येत्या आठवडय़ात 15 व 16 एप्रिलाला ऑनलाइन पद्धतीने जेईई परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेतून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मे 2018 रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. आयआयटी, एनआयटी या संस्थामध्ये प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेण्यात आली असून, या परीक्षेसाठी देशभरातील 258 केंद्रांवर 11 लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यातून सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरणाप आहेत.
निगेटिव्ह मार्किग
जेईई मेन परीक्षेत एकूण 360 गुणांसाठी 90 प्रश्न विचारण्यात आले होते. यात गणिताचे 3क्, भौतिकशास्त्रचे 3क् व रसायनशास्त्रच्या 3क् प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जाणार असून, निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार परीक्षा घेण्यात आल्याने विद्याथ्र्याना अतिशय काळजीपूर्वक उत्तरे द्यावी लागली. त्यामुळे संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ पूरला नसल्याची प्रतिक्रिया काही विद्याथ्र्यानी व्यक्त केली.