नाशकात स्वाईन फ्ल्युचे आत्तापर्यंत दहा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 07:10 PM2019-07-11T19:10:12+5:302019-07-11T19:14:48+5:30
नाशिक- शहरात गेल्या सात महिन्यात दीडशे स्वाईन फ्ल्यु रूग्ण आढळले आहेत. त्याच प्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक पथक शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये येणार असून वैद्यकिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

शहर कितीही स्मार्ट करण्याचा प्रयत्न झाला तरी आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था कायम आहे. गेल्यावर्षी नाशिक मध्ये स्वाईन फ्ल्युचा केवळ एकच रूग्ण आढळला होता आणि त्याचाच मृत्यू झाला होता. यंदा मात्र जानेवारी महिन्यापासूनच रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली. जानेवारीत सात, फेब्रुवारी ४२, मार्च महिन्यात ५०, एप्रिल ३७, मे महिन्यात ११ तर जून महिन्यात तीन आणि जुलै महिन्यात एक या प्रमाणे आत्तापर्यंत १५० रूग्ण आढळले आहेत. त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात आढळलेल्या एकमेव रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सर्वाधिक स्वाईन फ्ल्यु रूग्ण असलेल्या यादीत नाशिकचा क्रमांक आघाडीवर असून विषाणु बदलत असल्याने त्यावर सातत्याने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर आरोग्य खात्याचे एक पथक शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये येणार असून इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात सकाळी ११ वाजता महापालिका तसेच जिल्हा शासकिय रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी तसेच विविध वैद्यकिय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना साथ रोगाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहेत.