भाडेकरूंना द्यावे लागणार आधारकार्डासह पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:44 PM2017-10-27T23:44:00+5:302017-10-28T00:10:52+5:30
शहरात आता घर भाड्याने घ्यायचे असेल तर आधारकार्ड, पॅनकार्डसारखे पुरावे द्यावे लागणार आहेत. पाथर्डी फाटा येथे एका इमारतीत अहमदनगर येथील कुख्यात गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात इस्टेट एजंट्सची तातडीने बैठक घेण्यात आली. यावेळी भाडेतत्त्वावर घर देणारे घरमालक तथा घर मिळवून देणारे एजंट यांनी भाडेकरुंची माहिती पुराव्यासह पोलिसांना द्यावी, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी केले़
इंदिरानगर : शहरात आता घर भाड्याने घ्यायचे असेल तर आधारकार्ड, पॅनकार्डसारखे पुरावे द्यावे लागणार आहेत. पाथर्डी फाटा येथे एका इमारतीत अहमदनगर येथील कुख्यात गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात इस्टेट एजंट्सची तातडीने बैठक घेण्यात आली. यावेळी भाडेतत्त्वावर घर देणारे घरमालक तथा घर मिळवून देणारे एजंट यांनी भाडेकरुंची माहिती पुराव्यासह पोलिसांना द्यावी, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी केले़ गोरे यांनी सांगितले की, घरमालक वा एजंट यांनी घर भाडेतत्त्वावर देताना संबंधित भाडेकरूंची माहिती प्रथम संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी़ पोलिसांकडून संबंधित भाडेकरूंची पूर्ण माहिती तपासली जाणार असून, तो गुन्हेगार तर नाही याची खात्री केली जाणार आहे़ यामुळे गुन्हेगारांना आश्रय मिळणार नाही तसेच गुन्हेगारी रोखण्यासही मदत होईल़ गुन्हेगार भाडेकरूंच्या रुपाने शहरात राहून शांतता भंग करू नये यासाठी घरमालक आणि भाडेकरू यांच्यावर हे निर्बंध घालण्यात आले आहे़ त्यामुळे घर भाडेतत्त्वावर देताना घरमालक वा एजंट यांनी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, वाहनपरवाना यापैकी एक छायांकित प्रत घेणे व फॉर्म भरून संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे़ असे न करणाºया संबंधित एजंट व घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे गोरे म्हणाले़ या बैठकीस पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, उपनिरीक्षक गावित यांसह परिसरातील सुमारे चाळीस एजंट उपस्थित होते.