पोलिसांच्या अ‍ॅपवर भाडेकरूंची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:10 AM2018-11-27T01:10:12+5:302018-11-27T01:10:32+5:30

घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक असून, पोलिसांनी घरमालकांच्या सोयीसाठी ‘टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम अ‍ॅप’ विकसित केले आहे. शहरातील दीड हजाराहून अधिक नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर केला असून, ९२५ घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती या अ‍ॅपवर टाकली आहे.

 Tenants' information on police app | पोलिसांच्या अ‍ॅपवर भाडेकरूंची माहिती

पोलिसांच्या अ‍ॅपवर भाडेकरूंची माहिती

googlenewsNext

नाशिक : घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक असून, पोलिसांनी घरमालकांच्या सोयीसाठी ‘टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम अ‍ॅप’ विकसित केले आहे. शहरातील दीड हजाराहून अधिक नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर केला असून, ९२५ घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती या अ‍ॅपवर टाकली आहे. यापैकी ३४३ घरमालकांची नोंदणीप्रक्रियाही पूर्ण झाली आहे़ विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या दोन गुन्हेगारांची ओळख पटली आहे़ दरम्यान, ५६७ भाडेकरूंची नोंदणी प्रलंबित असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे़  घरमालकाने घरात भाडकरू ठेवल्यास त्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करावी लागते़ या प्रकारची नोंद न करणाºया घरमालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची माहिती मिळावी, असा यामागे हेतू आहे़ तर घरमालकांना भाडेकरूंची माहिती देणे सोपे व्हावे यासाठी शहर पोलिसांनी टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम अ‍ॅपची निर्मिती केली आहे़ या अ‍ॅपद्वारे घरमालकांना माहिती भरणे अधिक सोपे झाले असून, त्यांनी भरलेली माहिती पोलिसांच्या ‘थर्ड आय’ या अ‍ॅपमध्ये लोड होते़ या अ‍ॅपच्या माध्यमातून पोलिसांकडे शहरातील भाडेकरूंची माहिती उपलब्ध असणार असून, त्याचा उपयोग त्यांना गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी होणार आहे़
पोलीस ठाणेनिहाय भाडेकरूंची नोंदणी
पोलीस ठाणे नोंदणी प्रलंबित मंजुरी मिळाली
सरकारवाडा १८ ९ ९
पंचवटी २९ २० ९
आडगाव १३८ १९ ११२
म्हसरूळ ७४ ६६ ८
भद्रकाली ५ ५ ०
मुंबई नाका २० २० ०
गंगापूर २१ १४ ६
सातपूर १४२ २९ १०८
इंदिरानगर १४४ १३९ ०४
अंबड १४० ९३ ४७
नाशिकरोड १५७ १४४ १३
उपनगर ३४ ६ २७
देवळाली कॅम्प ३ ३ ०
एकूण ९२५ ५६७ ३४३

Web Title:  Tenants' information on police app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.