ग्रामीण भागातील मुलांचा कल संगणकीय खेळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:25 AM2020-12-03T04:25:24+5:302020-12-03T04:25:24+5:30
पूर्वी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की सापशिडी, चल्लस, लगोरी, लंगडी आशा खेळांचे वेध लागत असत, मात्र सध्या ग्रामीण भागात ...
पूर्वी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की सापशिडी, चल्लस, लगोरी, लंगडी आशा खेळांचे वेध लागत असत, मात्र सध्या ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक्स गेम, मोबाइल गेम खेळण्याकडे अधिक कल आहे. टीव्ही समोर तासन्तास कार्टून मालिका पाहण्यात लहान मुलांचा वेळ जात आहे.
लंगडीचा खेळ मुले आता पूर्णपणे विसरले असतील असे वाटते तर सापशिडी, चल्लस हे खेळ आता एकदम तुरळक ठिकाणी मुले खेळताना दिसतात. काळाच्या ओघात उन्हाळ्यातील खेल आता इतिहास जमा झाले आहेत.
त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. पूर्वी चार मुले एकत्र यायचे बुद्धिबळ, कॅरम किंवा सापशिडीमध्ये रमवायचे यातून अधिकाधिक बालमित्र जवळ यायचे यातून एक प्रकारचे भावनिक नाते निर्माण होऊन ते संबंध आयुष्य भर जपले जायचे. पण आता मात्र असे होताना दिसत नाही. या खेळामुळे एकलकोंडीपणा वाढला असल्याचे दिसून येत आहे.
शहरी व ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक्स गेम व मोबाइल गेम खेळण्यावरच भर दिसतो. यामुळे डोळ्यांचे आजार वाढत चालल्याचे चित्र आहे.
ॲण्ड्रॉइड गेमला अधिक पसंती...
सर्वत्र ॲण्ड्रॉइड मोबाइलचे प्रचलन वाढले आहे व त्यातील गेमही अत्याधुनिक असल्याने ते खेळण्यावर अधिक भर असतो, यात ग्रामीण भागातील मुले मागे नसल्याचे दिसून येत आहे यामुळे पारंपरिक खेळ आता नाहीसे होत आहे. (०१ गेम)