मनपाच्या बससेवेसाठी  मागविल्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:00 AM2019-01-22T02:00:02+5:302019-01-22T02:00:45+5:30

शहर बस वाहतुकीसाठी अखेरीस महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने दहा वर्षे स्वमालकीच्या बस चालविण्यासाठी ठेकेदारांना आवाहन करण्यात आले आहे.

Tender sought for bus service from Municipal Corporation | मनपाच्या बससेवेसाठी  मागविल्या निविदा

मनपाच्या बससेवेसाठी  मागविल्या निविदा

Next

नाशिक : शहर बस वाहतुकीसाठी अखेरीस महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून, ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने दहा वर्षे स्वमालकीच्या बस चालविण्यासाठी ठेकेदारांना आवाहन करण्यात आले आहे. ८ मार्चपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत असून, सर्व काही सुरळीत झाल्यास नव्या आर्थिक वर्षात बससेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.  नाशिक महापालिकेने बससेवा चालविण्यास घेण्याचा प्रस्ताव आत्तापर्यंत सहा वेळा नाकारण्यात आला आहे, परंतु राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने ही सेवा बळजबरीने माथी मारण्यात आली आहे. विरोधी पक्षांचा विरोध बहुमतासमोर टिकला नाही. त्यामुळे दरवर्षी ही सेवा तोट्यात जाईल, असे मान्य करूनही महापालिकेने ही सेवा चालविण्यास घेण्याचे ठरवले आहे. बससेवेसाठी आग्रही असलेले माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील ही सेवा तोट्यातच जाईल, अशी कबुली देऊनही शहरवासीयांसाठी सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून बससेवेचा प्रस्ताव सादर केला होता. महापालिकेचा तोटा वाढू नये आणि किमान ना नफा ना तोटा तत्त्वावर बस चालवावी यासाठी महापालिकेने स्वत: बस किंवा कर्मचारी वर्गाचे दायित्व स्वीकारलेले नाही. तर ठेकेदार कंपनीला बस खरेदी, त्यांची देखभाल दुरुस्ती, वाहनचालक व इतर कर्मचारी वर्ग सर्व जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे. महापालिकेच्या वतीने केवळ वाहक म्हणजेच कंडक्टर पुरवण्यात येणार असून, बससेवेसाठी खास काही पदे भरण्यात येणार आहेत. बससेवेसाठी मनपाच्या वतीने खास कंपनी गठित करण्यात आली असून, या कंपनीला बससेवेचे सर्वाधिकार असतील. मनपा मात्र फक्त बससेवेतील तोटा भरण्यासाठीच सहभाग देणार आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात महासभेत बससेवेचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी बससेवेसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे त्यात बदल करावा लागला आणि बस कंपनी स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला. दरम्यान, तुकाराम मुंढे यांची बदली होईपर्यंत सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव रोखून ठेवला होता. राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्यानंतर पंधरा दिवसांनी हा ठराव देण्यात आला त्यानंतर आता त्यासंदर्भात निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.
दहा वर्षांसाठी बससेवा
महापालिकेने शहर बससेवेसाठी खरेदी, व्यवस्थापन, संचलन व देखभाल करण्यासाठी एकूण दहा वर्षे कालावधीसाठी निविदा काढण्यात आली आहे. यात एकूण चारशे बस या ठेक्यात अंतर्भूत असून प्राधान्य सर्व सीएनजी बससाठीच आहे. त्या कमी पडल्या तर डिझेल बस वापरात येणार आहे. शिवाय एका मॅकेनिझमवरच अवलंबून राहणे सोपे नसल्याने दोन पर्याय सुचविण्यात आले आहेत.

Web Title: Tender sought for bus service from Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.