अंदाजपत्रकातील २५० कोटी रुपयांच्या काढल्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:15 AM2021-01-25T04:15:56+5:302021-01-25T04:15:56+5:30

नाशिक : महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या ...

Tenders drawn in the budget of Rs. 250 crore | अंदाजपत्रकातील २५० कोटी रुपयांच्या काढल्या निविदा

अंदाजपत्रकातील २५० कोटी रुपयांच्या काढल्या निविदा

Next

नाशिक : महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या अडीचशे केाटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या असून, त्यामुळे आता प्रलंबित कामांमुळे नाराज नगरसेवकांची बरीच कामे पूर्ण होणार आहेत. अर्थात, ही कामांच्या निविदा आत्ताशी निघाल्याने पुढील आर्थिक वर्षात देयके द्यावी लागणार असल्यानेच आता ही कामे करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, सत्तारूढ भाजपच्या मागणीनुसार ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मात्र प्रशासनाचा नकारच कायम आहे.

महापालिकेच्या सध्याच्या पंचवार्षिक कारकिर्दीचे हे अखेरचे वर्ष असून, पुढील वर्षी मात्र सर्वच पक्षांना निवडणुकींना सामेारे जावे लागणार आहे. गेले वर्ष कोरोनाच्या संकटात गेल्याने आता मात्र विकासकामांची लगीन घाई सुरू झाली आहे. किमान कामे मंजूर झाली तरी त्याचे नारळ फोडण्याचे काम आपल्याच कारकिर्दीत व्हावे यासाठी नगरेसवकांची लगबग सुरू आहे. सत्तारूढ भाजपने तर मागील ठरावात ३१ प्रभागांतील नागरी कामे विशेषत: रस्त्यांच्या कामे करण्याचा ठराव केला असून, त्यासाठी ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे घाटत आहे. मात्र, त्यास प्रशासनाचा नकार असून, शिवसेना तसेच काँग्रेस पक्षाने त्यास विरोध केला आहे.

सत्तारूढ भाजपकडून नागरी कामे होत नसल्याचे भांडवल केले जात असले तरी जी कामे अंदाजपत्रकीय सभेत मंजूर करण्यात आली आहे. ती कामे होणे अपरिहार्य आहे असे प्रशासनाचे म्हणणे असून, त्यामुळेच त्यांनी जानेवारी महिन्यातच तब्बल २५० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा मागविल्या आहेत. या कामांच्या निविदा मंजूर होणार असल्या तरी कामे सुरू होऊन देयके पुढील आर्थिक वर्षातच देण्याचे नियेाजन आहे. त्यामुळे आत्ता लगेचच देयके द्यावी लागणार नसल्याने या निविदा मागविण्यात आल्या आहेत.

इन्फो..

२५० कोटी रुपयांचे उड्डाण पूल

प्रशासनाने २५० कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूलदेखील करण्यास प्रशासनाने तयारी केली असून, त्याच्या निविदा मागविल्या आहेत. यापुलांची कामे अजून सुरू होणे बाकी असून, तीदेखील पुढील आर्थिक वर्षात सुरू हेाण्याची शक्यता असल्यानेच प्रशासनाने निविदा मागविल्या आहेत. मायको सर्कल आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौकात हे उड्डाण पूल बांधणे नियोजित आहे.

Web Title: Tenders drawn in the budget of Rs. 250 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.