नाणीजच्या नरेंद्राचार्यांचे प्रयागमध्ये शक्तिप्रदर्शन संगमावर त्रिवेणीपूजन : महाराष्ट्रातून लाखो भाविकांची उपस्थिती, गंगामाईच्या स्वच्छतेसाठी सरसावले सेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:47 AM2019-02-02T02:47:11+5:302019-02-02T02:47:39+5:30

प्रयागराज : नाणीजपीठाच्या भक्तांनी शुक्रवारी (दि.१) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या त्रिवेणी पूजनानिमित्त प्रयागमध्ये भव्य शोभायात्रा काढून व महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवित जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

TENNEEPUJAN on Shakti Pradarshan Sangam in Prayag of Nagas, presence of lakhs of devotees from Maharashtra, a servant who has come to clean the Gangnami | नाणीजच्या नरेंद्राचार्यांचे प्रयागमध्ये शक्तिप्रदर्शन संगमावर त्रिवेणीपूजन : महाराष्ट्रातून लाखो भाविकांची उपस्थिती, गंगामाईच्या स्वच्छतेसाठी सरसावले सेवक

नाणीजच्या नरेंद्राचार्यांचे प्रयागमध्ये शक्तिप्रदर्शन संगमावर त्रिवेणीपूजन : महाराष्ट्रातून लाखो भाविकांची उपस्थिती, गंगामाईच्या स्वच्छतेसाठी सरसावले सेवक

Next

प्रयागराज : नाणीजपीठाच्या भक्तांनी शुक्रवारी (दि.१) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या त्रिवेणी पूजनानिमित्त प्रयागमध्ये भव्य शोभायात्रा काढून व महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवित जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
कुंभमेळ्यातील आखाड्यांच्या नगरप्रवेशाच्या पेशवाई व पहिल्या शाहीस्नानानिमित्तच्या मिरवणुकांं ंनंतर नरेंद्राचार्य महाराजांच्या त्रिवेणी पूजनासाठी निघालेल्या शोभायात्रेने अवघ्या प्रयागवासीयांचे लक्ष वेधून घेतले. हरहर गंगेच्या गजरात हे त्रिवेणीपूजन पार पडले. त्यासाठी हजारो भाविक महाराष्ट्रातून प्रयागला दाखल झाले होते.
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन
शोभायात्रेत नाशिकचे वाघ्या-मुरळी पथक, मुंबई व कोल्हापूर जिल्ह्यातील वासुदेव, रत्नागिरीचे जाकडी नृत्य, नागपूरचे तंट्या भिल्ल, पश्चिम पालघरचे तराफा नृत्य, कोल्हापूरचा दांडपट्टा, लातूरचे टिपरी नृत्य, पूर्व पालघरचे तराफा, अहमदनगरच्या भक्तांनी केलेली महाराष्टÑातील संतांची वेशभूषा, जळगाव व धुळ्याचे आदिवासी नृत्य, उत्तर नांदेडचे बंजारा नृत्य आदी पथकांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. संग्राम सेनेच्या वानर सेनेनेही प्रयागवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विविध २० कलापथकांनी यात आपली कला सादर केली.
नाशिकप्रमाणे वेधले लक्ष
नाशिकच्या २००३-०४ च्या सिंहस्थातील ध्वजारोहण नरेंद्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी शहरातून काढलेली मिरवणूक चर्चेचा विषय बनली होती, त्याचप्रमाणे प्रयागमध्ये त्यांनी सर्व आखाडे व शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.
संत-महंतांचा मोठा सहभाग
शोभायात्रेत जगद्गुरु हंसदेवाचार्य, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी, श्री पंच निर्वाणी अनि आखाड्याचे श्री महंत धर्मदास, निर्मोहीचे महंत श्री राजेंद्रदास, दिगंबर अनिचे महंत श्री कृष्णदास, नया उदासीन आखाड्याचे महंत श्री जगतार मुनी, निर्मलचे महंत श्री ज्ञानदेवसिंंह आदी संत-महंत मोठ्या संख्येने सहभागी होते.
आरोग्य व स्वच्छतेची सेवा
प्रयाग कुंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नाथ सांप्रदायाच्या भव्य मंडपानंतर स्वामी नरेंद्राचार्यांचा आलिशान मंडप भाविकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. शिवाय त्यांच्या १५ रु ग्णवाहिका, ३ दवाखाने आरोग्यसेवा बजावत असून, १००० सेवक गंगामाईच्या स्वच्छतेची काळजी घेत आहेत.

Web Title: TENNEEPUJAN on Shakti Pradarshan Sangam in Prayag of Nagas, presence of lakhs of devotees from Maharashtra, a servant who has come to clean the Gangnami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.