दहा हजारांवर अॅँटिजेन टेस्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:55 PM2020-07-28T23:55:10+5:302020-07-29T00:55:34+5:30
नाशिक : ‘मिशन झिरो नाशिक’अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल १०,५९७ रु ग्णांच्या अॅँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून ९७८ कोरोनाबाधित रु ग्ण शोधून कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी संघटना यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो नाशिक’ या एकात्मिक कृती योजनेच्या सातव्या दिवशी नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात. त्यात महानगरपालिकाने आखून दिलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये चाचण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. यासर्व ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने रुग्णांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होत असल्याने धावपळ कमी झाली आहे.
संक्रमण थांबणार समुपदेशन करणाऱ्यावर भर; कोविड सेंटरमध्ये उपचार१ मिशन झिरोअंतर्गत आजपावेतो १०५९३ अँटिजेन चाचण्या होऊन ९७८ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह रु ग्णांना लवकर शोधून काढणे, योग्य ते उपचार करणे, समुपदेशन केल्यास संक्र मणही थांबवता येईल.
२प्रशासनाबरोबरच बीजेएसच्या अॅँटिजेन चाचण्या वाढत असून, त्या प्रमाणात पॉझिटिव्ह रु ग्णदेखील अधिकाधिक संख्येने मिळत आहेत. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह रु ग्णांना लवकर शोधून काढणे हा कोरोना प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे.
३पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रु ग्णांना गृहविलगीकरण किंवा कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली. नाशकात दिवसभरात ४६८ रुग्ण बरे; चोवीस तासांत तिघांचा मृत्यू