प्रलंबित अहवाल तब्बल दहा हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 01:38 AM2021-04-12T01:38:18+5:302021-04-12T01:39:22+5:30
काेरोना बळींनी पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६८२ वर पोहोचली आहे.
नाशिक : काेरोना बळींनी पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६८२ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात एकूण ३७४१ रुग्ण नव्याने बाधित, तर ३७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात प्रथमच प्रलंबित अहवालांची संख्या दहा हजारांवर पोहोचली असल्याने आठवडाभर बाधितांचा आकडा मोठाच येण्याची चिन्हे दिसत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी आणि प्रलंबित अहवाल हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १८४६, तर नाशिक ग्रामीणला १७९१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २८ व जिल्हाबाह्य ७६ रुग्ण बाधित आहेत, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०९, ग्रामीणला २१, तर जिल्हाबाह्य १ असा एकूण ३१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. गत दोन दिवसांपासून प्रलंबित अहवालांच्या संख्येने आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रलंबित संख्येची नोंद केली. शनिवारी ९६४१ प्रलंबित संख्येत अजून भर पडल्याने हा आकडा रविवारी १० हजार ८५१ वर पोहोचला आहे.
सर्वाधिक बळींची वाढ
मृतांच्या संख्येत गत पाच दिवसांपासून सातत्याने तीसहून अधिक बळींची भर पडली आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसात जिल्ह्यातील बळींच्या संख्येत १५०ने वाढ झाली आहे. बळींमधील ही वाढ आतापर्यंतच्या कोणत्याही एका आठवड्यातील सर्वाधिक वाढ आहे.