पूर्व प्रभागसभेत  काहीकाळ तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:49 AM2018-07-10T00:49:32+5:302018-07-10T00:49:49+5:30

पूर्व प्रभागसभेत महापालिका आयुक्तांनी मांडलेल्या कामाची आवश्यकता, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा फटका चार महिन्यांनंतर झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेला बसला त्यामुळे विषयपत्रिकेवर एकही विषय नसल्याने सभेत आरोग्य आणि पाणीप्रश्नावरून प्रशासनावर सदस्य आक्रमक झाले. यामुळे प्रभागसभेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

Tense for sometime in the East Divisional Assembly | पूर्व प्रभागसभेत  काहीकाळ तणाव

पूर्व प्रभागसभेत  काहीकाळ तणाव

Next

इंदिरानगर : पूर्व प्रभागसभेत महापालिका आयुक्तांनी मांडलेल्या कामाची आवश्यकता, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा फटका चार महिन्यांनंतर झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेला बसला त्यामुळे विषयपत्रिकेवर एकही विषय नसल्याने सभेत आरोग्य आणि पाणीप्रश्नावरून प्रशासनावर सदस्य आक्रमक झाले. यामुळे प्रभागसभेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.  पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मधील वडाळागावात गेल्या वीस दिवसांपूर्वी साथीच्या आजाराने म्हणजे चिकनगुन्याने नागरिक त्रस्त झाले होते जेव्हा घटना घडते तेव्हाच उपाययोजना करण्यात येते त्याआधी काय उपाययोजना करण्यात येत नाही? असा प्रश्न अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केला तसेच धूर व औषध फवारणी होत नाही. वडाळागाव व राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथावरील अतिक्रमण का काढले जात नाही अशीही तक्रार बडोदे यांनी केली.  द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांचा पालापाचोळा ठिकठिकाणी पडून असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो तातडीने उचलण्याची मागणी अर्चना थोरात यांनी केली. तसेच प्रभाग ३० मधील पांडवनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि वडाळा-पाथर्डी रस्त्यावर पुन्हा भाजीविक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन लहान-मोठे अपघात होत असल्याची तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली तसेच चार्वाक चौक परिसरात व्हालमनच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागले त्यामुळे त्याची बदली करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली.
वडाळागावात होणारा गढूळ पाणीपुरवठा आणि रामोशीगल्लीत सुमारे दीड महिना जलवाहिनी टाकण्याच्या कामास वेळ लागल्याने त्याचा जाब सुप्रिया खोडे यांनी विचारला. राजवाडासह परिसरातील भूमिगत गटारीचे चेंबर तुटले असून, ते दुरुस्त करण्यात येत नसल्याची तक्रार शोभा साबळे यांनी केली. सभेस विभागीय अधिकारी जयश्री सोनावणेंसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभागात किती सफाई कर्मचारी
सुमारे चार महिन्यांपूर्वी झालेल्या प्रभागसभेत प्रत्येक सदस्याला त्यांच्या प्रभागात किती सफाई कर्मचारी आहे त्यांचे नाव आणि फोननंबरची यादी देण्यात येणार होती ती अद्याप दिली गेली नाही, अशी तक्रार आशा तडवी यांनी केली तसेच स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांना सुमारे पंधरा ते वीस वेळा फोन करून सुद्धा ते उचलत नाही किंवा परत आम्हाला फोन करत नाही, असे तडवी यांनी सांगितले.

Web Title: Tense for sometime in the East Divisional Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.